FIR SUBMIT : तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही; आता घरबसल्या मोबाईलवर करा ऑनलाईन तक्रार..
पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची फिर्याद करु शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. ऑनलाइन तक्रार कश्या प्रकारे करायची जाणून घ्या..
FIR SUBMIT : गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते;
अदखलपात्र गुन्हा
दखलपात्र गुन्हा
अदखलपात्र गुन्हा- म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.
दखलपात्र गुन्हा – म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.
FIR SUBMIT : आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.
ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?
>>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on June 25, 2024 11:05 am