समुद्रशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की शरीरावर बनलेल्या लहानशा खुणा तुमच्या नशिबावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. आज आपण जाणून घेऊया नखांच्या वर असलेल्या पांढऱ्या खुणेबद्दल… नखांवरील पांढरी खून नेमकं काय दर्शवते? आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो याबाबत जाणून घेऊया…
अंगठा : समुद्रशास्त्रानुसार अंगठ्याच्या नखेवर पांढरे चिन्ह शुभ मानले जाते. ही लोक आपले नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे जपतात. तसेच ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या नखेवर पांढरे चिन्ह असते तो व्यवसायात खूप प्रगती करतात. यासोबतच अशा लोकांना आयुष्यात असा मित्र मिळू शकतो ज्याबाबत तुम्ही खूप गंभीर असू शकता.
तर्जनी : ज्या व्यक्तीच्या तर्जनीच्या नखेवर म्हणजेच अंगठ्याजवळील बोटावर पांढरी खूण असते त्या व्यक्तीला समाजात खूप मान मिळतो आणि ती व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात पैसा कमावते . तसेच नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीमध्ये त्यांचे वर्चस्व असते.
अनामिका : जर तुमच्या अनामिकेच्या नखेवर ही पांढरी खूण असेल तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तुमच्या पाठीशी लक्ष्मीमातेची सदैव कृपा राहते आणि तुमचं जीवन संपत्ती आणि वैभवाने भरलेले असते.
मधले बोट : ज्या व्यक्तीच्या मधल्या बोटाच्या नखेवर पांढरा डाग असतो तो खूप शुभ मानला जातो. असं मानले जाते की अशा लोकांना प्रवास करणे खूप आवडते. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप प्रवास करतात. परंतु त्यांना आपल्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल.
करंगळी : जर करंगळीच्या नखेवर पांढरे चिन्ह असेल तर अशी व्यक्ती व्यवसायात खूप प्रगती करते तसेच विज्ञान क्षेत्रातही त्यांना खूप यश मिळते.
वैज्ञानिक दृष्ट्या हाताच्या नखांवरील पांढरे डाग दर्शवतात ते पाहूया
नखावर येणारे हे डाग तुमच्या हृदय, फुफ्फुसे व हाडांना आवश्यक सत्व मिळत नसल्याचे लक्षण आहे. झिंकची कमतरता असल्यास शरीर नखांवरील पांढऱ्या रेषांमधून संकेत देत असते.
शरीरात झिंक कमी असल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे
झिंकची कमतरता ओळखणे कठीण आहे कारण झिंक शरीरात रक्तामार्फत अगदी छोट्या पेशींमध्ये विरघळलेले असते. त्यामुळे रक्त चाचणीत झिंकची कमतरता ओळखता येईलच असे नाही.
मात्र खालील काही लक्षणांमधून आपण झिंक कमी झाल्याचे ओळखू शकता.
▶️ थकूनही झोप न लागणे
▶️ सतत सर्दी- खोकला- ताप असे आजार होणे
▶️ सेक्स ड्राइव्ह कमी होणे
▶️ वजन अचानक वाढू लागते
▶️ दात किडतात आणि हिरड्यांमधून रक्त येते
▶️ हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे?
जर आपण मांसाहार करत असाल तर ऑयस्टर, खेकडा, मांस आणि अंडी असे पदार्थ झिंकने समृद्ध असतात. तर शाकाहारी मंडळींसाठी मशरूम, पालक, ब्रोकोली, लसूण, काळे चणे, बीन्स, भोपळा अशा भाज्या उत्तम पर्याय ठरतील. दुग्धजन्य पदार्थ, डार्क चॉकलेट सुक्या मेव्याचे सेवनही झिंकची कमी भरून काढण्यास मदत करू शकते. याशिवाय धान्यांमध्ये कॉर्नफ्लेक्स, मुसली, गहू, ब्राऊन राईस, ओट्स व क्विनोआ यांचे सेवन करणे गुणकारी ठरू शकते.
शरीराला किती प्रमाणात झिंक आवश्यक आहे?
हे पण वाचा 👇👇
🤲 हातावर असणारे कोणते तीळ शुभ आणि कोणते अशुभ मानले जातात❓
झिंकचे जास्त सेवन हे शरीरात रक्तामध्ये तांबे आणि लोहाच्या शोषणात व्यत्यय आणू शकते. यातून मळमळ, उलट्या, अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते. प्रौढांमध्ये दररोज ४० मिलीग्रामहुन जास्त झिंकचे सेवन नुकसानकारक ठरू शकते. यामुळे ताप, खोकला, डोकेदुखी आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात.
शिवाय, झिंक सप्लिमेंट्स प्रतिजैविकांच्या शोषणात व्यत्यय आणतात साइड इफेक्ट्सचा धोका कमी करण्यासाठी, वैद्यकीय सल्ला घेऊनच झिंकयुक्त पदार्थांचे व औषध गोळ्यांचे सेवन करावे. वैद्यकीय देखरेखीशिवाय, दररोज ४० मिलीग्रामहुन अधिक झिंक सप्लिमेंट्स चुकूनही घेऊ नका.
👍 नवीन काहीतरी वाचायच असेल तर आत्ताच जॉईन करा👇
This post was last modified on %s = human-readable time difference 11:29 am