X

Farmer Loan waiver : राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीचा निर्णय लवकरच

Farmer Loan waiver

Farmer Loan waiver : दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींसह हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकरी सध्या अडचणीत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बॅंकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बॅंकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

Farmer Loan waiver : सध्या बॅंकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी देखील थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा ठोठावत आहेत. दुसरीकडे खासगी सावकारांकडूनही तगादा सुरु आहे. अशा परिस्थितीत अडचणीतील बळिराजा संकटाच्या चक्रव्युवहात सापडला असून राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

शेतकरी कर्जमाफी होणार ?

Farmer Loan waiver : महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात बोलताना महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देईल, अशी ग्वाही दिली. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांच्या वचननाम्यात तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हटणार आहे.

शेतकरी थकबाकीची स्थिती

>>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on %s = human-readable time difference 6:07 am

Davandi: