Diwali Bonus : आपण आपला बोनस कसा खर्च कराल?
खरेदी: नवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, किंवा घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी?
बचत: भविष्यासाठी पैसे बाजूला ठेवण्यासाठी?
प्रवास: एक सुट्टी बुक करण्यासाठी?
आर्थिक गुंतवणूक: शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी?
दाण: गरजूंना मदत करण्यासाठी?
बोनसच्या रुपाने मिळालेली रक्कम आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी वापरु शकतो. आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करुन दरवर्षी दहा ते पंधरा टक्के परतावा मिळवू शकता. याप्रमाणे डेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास ८ ते १२ टक्के परतावा मिळू शकतो. आपल्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना किंवा मुदत ठेवीत त्याचा वापर करु शकतो. तसेच आरोग्य विम्यासाठी देखील या पैशाचा वापर करता येतो.
आपत्कालिन निधी उभारा
नोकरदार वर्गांसाठी आपत्कालिन निधी असणे खूपच आवश्यक आहे. जर आपण आतापर्यंत इमरजन्सी फंड केला नसेल तर बोनसच्या पैशाची मदत घेऊ शकता. जर अगोदरपासूनच इमरजन्सी फंड असेल तर त्यात आपण वाढ करु शकतो. या फंडमध्ये किमान सहा महिन्याच्या उत्पन्नाएवढा निधी असणे गरजेचे आहे. यात आपल्याला कर्जाचा हप्ता, दररोजचा खर्च, शाळेची फिस, विमा हप्ता, अन्य खर्चाचा विचार करावा लागेल.
खर्चापूर्वी यादी तयार करा
बोनसच्या रुपाने गरजेचे सामान खरेदी करणे शहाणपणाचे लक्षण ठरेल, दिवाळीच्या खरेदीअगोदर आवश्यक सामानाची यादी तयार करा. त्यानंतर खरेदीची निश्चिती करा. अशा स्थितीत आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घेण्याची गरज भासणार नाही.
बिल आणि कर्जाची परतफेड करणे
जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करत असाल आणि बिल पेंडिंग असेल तर बोनसच्या रुपातून मिळालेला पैसा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी वापरावे. पर्सनल लोन असेल तर बोनसच्या पैशातून ते लोन संपवू शकता. कर्ज जेवढे कमी असेल त्याप्रमाणात आपली आर्थिक स्थिती चांगली राहते. उदा. जर आपल्याला ५० हजार रुपये बोनस मिळत असेल
तर त्यापैकी दहा ते पंधरा हजार गुंतवणूक किंवा अन्य गरजेच्या बाबींसाठी खर्च करावेत. उर्वरित तीस ते ३५ हजार रक्कम दिवाळीतील खरेदीसाठी खर्च करावे. यात महिन्याच्या किराणा सामानाचाही समावेश करावा. जेणेकरून पुढील महिन्यात आर्थिक ताण राहणार नाही. आजकाल मॉलमध्ये किराणा सामनावर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते. खराब न होणार्या वस्तूंची खरेदी करुन अधिक लाभ मिळवण्याचा विचार करावा.
Diwali Bonus : काय करावे?
▶बोनसच्या ७० ते ८० टक्के रक्कम ही गुंतवणूक वाढविण्यासाठी करावी. दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करावा.
▶ वीस ते ३० टक्क्यांपेक्षा कमी रक्कमेची खरेदी करणे हे हिताचा निर्णय ठरेल.
▶ इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा. दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत परतावा मिळवू शकतो. एसआयपीच्या माध्यमातूनही गुंतवणूक सुरू करता येईल.
▶ यावर्षी सोन्यात गुंतवणूक करणे काहीसे जोखमीचे ठरू शकते. कारण भाव ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. अशा वेळी गोल्ड | इटीएफचा विचार करता येईल.
▶ आपले पीपीएफ खाते असेल तर काही रक्कम त्यात टाकण्याबाबतही सकारात्मक असायला हवे. याशिवाय लहान रक्कमेची एक वर्षाची मुदत ठेव करायला हरकत | नाही. पुढील दिवाळीला किंवा आवश्यक खर्चासाठी अतिरिक्त रक्कम म्हणून ती उपयुक्त ठरू शकते.
>>>>धोका! हा नंबर तुमचा मोबाईल हॅक करून बँक अकाउंट रिकाम करू शकतो
>>>> दहावीची परीक्षा आणखी सोपी! अकरावीला प्रवेश मिळवणे झाले सोपे
This post was last modified on October 24, 2024 1:52 pm