ज्यांनी आपले पॅन आधारशी लिंक केले नाही, त्यांचे पॅनकार्ड 1 जुलैपासून डिऍक्टिव्हेट झाले आहे. हे पॅनकार्ड आधारशी लिंक करून पुन्हा ऍक्टिव्हेट करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड आयकर विभागाकडून आकारण्यात येत आहे.
करदात्यांना बसू शकतो 6000 रुपयांचा दंड
ज्या करदात्याचे पॅन आधारशी लिंक नाही त्यांना आता 6000 रुपयांचा दंड बसू शकतो. कारण ITR भरण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. त्यानंतर ITR भरणाऱ्या करदात्यांना 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
तसेच तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यास 1,000 रुपये दंड आहे. असे असल्यास एकूण 6000 रुपये दंड भरावा लागेल.
डिऍक्टिव्हेट पॅनकार्ड सोबत कोणतेही व्यवहार केल्यास किंवा ITR भरल्यास 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार लागणार आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 8:10 am