X

BhagawanGad Dhananjay Munde : संकटाचा 53 वा दिवस, मीडिया ट्रायल बीड प्रकरणावर, नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

BhagawanGad Dhananjay Munde :

BhagawanGad Dhananjay Munde : : बीड हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. तर सत्ताधारीसह विरोधी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि गुन्हेगारीला राजाश्रय देण्याच्या आरोपांमुळे राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवान गड (Bhagwangad) धावून आला आहे.

भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला. आजपर्यंत भगवान गडाचा राजकीय कारणासाठी वापर करु न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 

BhagawanGad Dhananjay Munde : नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येईल. धनंजय मुंडे संकटात आहेत. अशावेळी धनंजय मुंडे यांनी कालची बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेला भगवान गड गाठला आणि तिथेच मुक्काम केला.

काल ते महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बोलले आणि आज सकाळीच नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली. भगवान गड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारा समाज असे समीकरण आहे.

वंजारा समाजाची भगवान गडावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे येथील महंतांचा शब्द वंजारा समाजासाठी अंतिम असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ताकद उभी केल्याने त्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.

This post was last modified on January 31, 2025 9:33 am

Davandi: