X

Bank Account : आयकर विभागाचे लक्ष बँक खात्यांवर! जाणून घ्या मर्यादा

Bank Account

Bank Account : बँकेचे व्यवहार प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. व्यापारी, उद्योजक यांचे बँकेत नियमित व्यवहार होत असतात. मोठी रक्कम ते नियमित बँकेत भरत असतात. परंतु त्यांचे बँक खाते करंट प्रकाराचे असते.

सर्वसामान्य व्यक्तींचे खाते बचत (सेव्हींग) प्रकारात असते. त्यात खात्यात रोकड भरण्याचे काही नियम आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम भरल्यावर आयकराची नजर तुमच्यावर येऊ शकते. आयकर विभागाच्या या नियामांची माहिती बँकेत खाते असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवी. काय आहेत हे नियम पाहू या…

▪️नियमाप्रमाणे तुमच्या बचत खात्यात किती रक्कम असावी, यासंदर्भात काही मर्यादा नाही.

▪️परंतु तुमच्या खात्यात जास्त रक्कम आल्यावर आयकर विभागाची नजर तुमच्यावर पडेल. तसेच बचत खात्यात चेक किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून 1 रुपयापासून लाख, कोटीपर्यंतचे व्यवहार तुम्हाला करता येणार आहे.
50,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड रक्कम तुम्ही जमा करत असाल तर पॅन क्रमांक द्यावा लागतो. तसेच एका दिवसात एका लाखाची रोकड जमा करता येते. परंतु तुम्ही नियमित खात्यात पैसे जमा करत नसाल तर ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे. एका आर्थिक वर्षांत 10 लाख रुपये जमा करता येतात.

Bank Account आयकर रिर्टन भरणाऱ्यांना सर्व खात्यासाठी ही मर्यादा आहे

▪️एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम रोकड भरल्यावर बँकेला त्यांची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. मग त्या खातेदारास आयकर विभागाला उत्पन्नाचे स्त्रोत दाखवावे लागणार आहे. तो व्यक्ती उत्पन्नाच्या स्त्रोत सांगू शकला नाही तर आयकर विभागाच्या रडारवर येणार आहे. त्याच्याविरोधात चौकशी सुरु केली जाईल. चौकशीत दोषी आढळल्यावर दंड केला जातो.

▪️10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि उत्पन्नाचे स्त्रोत दिले नाही तर त्या खातेदारास जमा रक्कमेवर 60 टक्के कर, 25 टक्के सरचार्ज आणि 4 टक्के सेस लागतो. म्हणजेच तुम्ही बचत खात्यातून 10 लाखांपेक्षा जास्त रोकड व्यवहार एका आर्थिक वर्षात करु शकत नाही. परंतु तुमच्याकडे उत्पनाने स्त्रोत असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही.

हेही वाचा  सीआरपीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 11,000+ पदांसाठी भरती, दहावी पाससाठीही संधी!

हेही वाचा : रोज च्युइंगम चघळणे: फायदे की तोटे? तज्ज्ञांनी केला खुलासा!

हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात

This post was last modified on October 1, 2024 10:26 am

Tags: Bank Account
Davandi: