Agricultural Service Centre : गाव तसंच तालुका पातळीवर आज कृषी सेवा केंद्रांची दुकानं मोठ्या प्रमाणावर थाटल्याचं दिसून येत आहे. कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण कृषी सेवा केंद्रांकडे एक व्यवसायाचं साधन म्हणून पाहत आहेत. कृषी सेवा केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करता येते. पण त्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो. त्यामुळे कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया काय असते? सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अर्ज कुठे करायचा?
▪️कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी कृषी पदविका तसंच कृषी विज्ञान विषयात पदवी (BSc.) प्राप्त तरुण-तरुणी अर्ज करू शकतात.
▪️कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागतो.
▪️‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. इथं सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि मग कृषी विभाग निवडून ‘कृषी परवाना सेवा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
▪️इथं तुम्ही बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
▪️कोणतीही एक गोष्ट विक्रीचा किंवा तिन्ही प्रकारचे परवाने तुम्ही मिळवू शकता.
Agricultural Service Centre : अर्जासाठी फी किती लागते?
- कीटकनाशके विक्रीचा परवाना – 7,500 रुपये
- बियाणे विक्रीचा परवाना – 1,000 रुपये
- रासायनिक खते विक्रीचा परवाना – 450 रुपये कागदपत्रे कोणती लागतात?
- जिथं दुकान टाकायचं आहे त्या जागेचा गाव नमुना-8
- ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र
- शॉप अॅक्टचं प्रमाणपत्र
- कृषी सेवा केंद्र उभारायची जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र
Agricultural Service Centre : अर्ज केल्यानंतर पुढे काय होतं?
>>>>> येथे क्लिक करा <<<<
This post was last modified on November 11, 2024 12:09 pm