🍇 सहवास : दहा मिनिटे.. बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे, हे कळेल…
🍇 दहा मिनिटे.. बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे, हे समजेल…
🍇 दहा मिनिटे.. राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे, कळून येईल…
🍇 दहा मिनिटे..
विमा एजंट समोर बसा, जगण्या पेक्षा मेलेले केव्हाही बरे, असे वाटेल…
🍇 दहा मिनिटे.. व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे, असे वाटेल…
🍇 दहा मिनिटे… शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे, हे समजेल…
🍇 दहा मिनिटे.. चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे, अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल…
🍇 दहा मिनिटे… शेतकरी, कामगार यांच्यासमोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता, असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल…
🍇 दहा मिनिटे.. सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे, याचा साक्षात्कार होईल…
🍇 दहा मिनिटे… माऊलींच्या वारीत चाला, आपोआप तुमचा अहंकार, मी पणा गळून पडेल…
🍇 दहा मिनिटे.. मंदिरा मध्ये बसा, मनाला मनःशांती मिळेल…
मुलीची आई असणं किती भाग्याचं!!
🍇 दहा मिनिटे… लहान बालकाशी खेळा, नि:स्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल…
🍇 दहा मिनिटे..
आई वडिलां सोबत बसा, त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल…
❣️सहवास कुणाचा, हे खूप महत्त्वाचं असतं..!❣️
This post was last modified on %s = human-readable time difference 2:42 pm