X

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 25 मार्च 2023

▪️ राहुल गांधींची खासदारकी रद्द: निर्णयाच्या 3 तासांनी म्हणाले- भारताच्या आवाजासाठी लढतोय, कोणतीही किंमत मोजायला तयार

▪️ केंद्रीय तपास संस्थांना विरोध: 14 विरोधी पक्षांची CBI-EDच्या ‘दुरुपयोगा’विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 5 एप्रिलला सुनावणी

अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’
संकेतस्थळावर ताण आल्याने संकेतस्थळ उघडण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही.

विदर्भात पुन्हा विजांचा कडकडाट, ७ शेतमजूर जखमी

शासकीय कार्यालयांत मार्चअखेरची लगबग
मिळालेल्या अनुदानातून ठरवून घेतलेली कामे त्या-त्या अर्थसंकल्पीय वर्षात पूर्ण करणे बंधनकारक असते.

विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता ; राहुल गांधी ‘जोडे मारो’वरून विरोधक आक्रमक
विधिमंडळाच्या आवार आणि सभागृहातही बोलताना सगळय़ांनीच तारतम्य बाळगायला हवे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

राहुल गांधींनी १० वर्षांपूर्वी फाडलेला अध्यादेश आज बनला असता त्यांच्यासाठी ‘संकट मोचक’
तत्कालीन यूपीए सरकारने आणलेल्या अध्यादेशाबाबत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले होते आणि आज इतिहासाचा तोच प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून गेला असावा

मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एंट्री, यूपी वॉरिअर्सवर ७२ धावांनी दणदणीत विजय

आरटीई प्रवेश अर्जांसाठी आज शेवटचा दिवस
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत शनिवारी (२५ मार्च) संपणार आहे.

▪️ राहुल गांधी प्रकरणावर प्रतिक्रिया: चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला; देश लुटणारे आजही मोकळेच आहेत – उद्धव ठाकरे

▪️ मुख्यमंत्र्यांना खोके, मिंधे, चोर-गद्दार म्हणतात; नाना हे कोणत्या आचारसंहितेत बसते? एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

▪️ मागील 3 महिन्यात (जानेवारी ते मार्च) देशभरात 2 लाख 78 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री इलेक्ट्रिककडे भारतीयांचा वाढला कल..!

▪️ विमान कंपनी GO FIRST एअरलाईन्सला 2 तास हवाई वाहतूक सेवा बंद ठेवण्याचे आदेश; वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी 1 एप्रिलला दुपारी 12 ते 2 सेवा असणार बंद

▪️ ब्रिटीश PM ऋषी सुनक खेळले क्रिकेट: सॅम करणने केली PM यांना गोलंदाजी, इंग्लंडचा टी-20 कर्णधार बटलरने भेट दिली जर्सी

▪️ उत्तर कोरियाचा हुकूमशहा किंग जॉनने समुद्राखालील ड्रोनची यशस्वी चाचणी केल्याची केली घोषणा; रेडिओ ऍक्टिव्ह त्सुनामीची दिली धमकी

▪️ TATA मोटर्सचा मोठा निर्णय! इलेक्ट्रिक कारसाठी स्पेशल शोरूमची श्रेणी करणार लाँच; सध्या टाटांच्या ताफ्यात Tigor, Nexon, Xpres व Tiago या इलेक्ट्रिक कार

▪️ आशिया चषक: पाकिस्तानमध्ये होऊ शकतो अर्धा आशिया चषक, टीम इंडियाचे सामने UAE, ओमान किंवा श्रीलंकेत

▪️ महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धा: सांगलीची प्रतिक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी; कल्याणच्या वैष्णवी पाटील हिचा पराभव

▪️ कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी: अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण, ट्वीट करत म्हणाली – ‘मी प्रथमच कोविड पॉझिटिव्ह’

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

This post was last modified on %s = human-readable time difference 2:11 am

Davandi: