X

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट: 19 मार्च 2023

राज्यात दिवसेंदिवस ‘एच ३ एन २’ आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आजचे यश, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे.

भविष्यात नाशिक देशाचे रसद केंद्र – नितीन गडकरी यांचा विश्वास
यावेळी गडकरी यांच्या हस्ते एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘सारथी सुविधा केंद्र’ या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

लोकशाहीच्या यशाचा काहींना त्रास!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबद्दल लंडनमध्ये केलेल्या विधानांवरून भाजपने त्यांना लक्ष्य केले असताना शनिवारी पंतप्रधानांनीही याबाबत भाष्य केले.

अवकाळी व गारपिटीचा मोठा फटका; राज्याच्या अहमदनगर, बीड, परभणी, उस्मानाबाद तसेच सोलापूर जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान!

जे नुकसान होईल, ते भरून देऊ, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी

आंदोलनाचा एक टप्पा पूर्ण: शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित, सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य- शेतकरी नेते जे. पी. गावित

📲 टेलिग्राम अॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर आले नवीन फिचर्स ! जाणून घ्या
https://davandi.in/2023/03/18/टेलिग्राम-अॅप-वापरकर्त्

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू हा सरकारचा हलगर्जीपणा, संजय राऊत यांचा निशाणा

छत्रपती संभाजीनगरला विरोध: इम्तियाज जलीलांनी घेतली कपिल सिब्बलांची भेट, औरंगाबादच्या नामांतराची लढाई सुप्रीम कोर्टात?

आत्ताच जुंपली: विधानसभेसाठी शिंदे गटाला 48 जागा- बावनकुळेंचा व्हिडिओ व्हायरल; अधिकारात आहे तेवढे बोला- संजय शिरसाट

उद्योगमहर्षी रतन टाटांच्या शिरपेचात मानाचा तुरा; ऑस्ट्रेलियन सरकारने ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ वर केली नियुक्ती!

‘अदानी-हिंडेनबर्ग’चा वाद: गृहमंत्री अमित शहा म्हणाले – SC च्या चौकशी समितीला पुरावे द्या, चूक करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही

बायडेन-मोदींची जूनमध्ये भेटीची शक्यता: PM मोदींसाठी डिनर होस्ट करू शकतात USचे राष्ट्राध्यक्ष, ‘योग दिना’ला मोदी शिकागोत मार्गदर्शन करणार

इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझर: कोर्टात सुनावणीसाठी जाताना म्हणाले- मला अटक करण्याचा डाव; पक्षासाठी समिती बनवणार

अर्शदीप सिंग खेळणार काउंटी क्रिकेट: केंटचे 5 सामन्यांसाठी अर्शदीपला निमंत्रण, जून आणि जुलैमध्ये होणार सर्व सामने

सचिनची वनडे क्रिकेट बदलण्याची ‘आयडिया’: फॉरमॅट इंटरेस्टिंग बनवण्याचा दिला सल्ला, 25-25 षटकांचे दोन डाव,10 विकेट

टेनिस स्टार नोवाक जेको्विक मियामी ओपन टेनिस स्पर्धेला नो एन्ट्री… कोरोना लस न घेतल्याने याआधीही ऑस्ट्रेलियन ओपन खेळू शकला नाही

अभिनेत्री माधुरी दीक्षितने दिवंगत आईसाठी ठेवली प्रार्थना सभा, विद्या बालन, बोनी कपूरसह अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

This post was last modified on %s = human-readable time difference 2:20 am

Davandi: