X

सकाळच्या टॉप घडामोडी : 28 मार्च 2023

महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ

ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक?: प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता, वीज नियामक आयोगाच्या आदेशाकडे लक्ष

उद्धव ठाकरे यांना तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पक्षाचे नाव अन् मशाल चिन्ह वापरता येणार

राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का?: एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना सवाल; राहुल गांधींच्या निषेधार्थ सावरकर गौरव यात्रा काढणार

सत्तेची धुंदी आलेल्या संजय शिरसाट यांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ, विकृतीने बरबटलेली; सुषमा अंधारे संतापल्या

पुण्यातल्या राठी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, राठी हत्याकांडातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीला जामीन, मुंबई सत्र न्यायालयाकडून 50 हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन

कर्जदाराचे म्हणणे ऐकल्याशिवाय बँकेने खाते ‘फ्रॉड’ घोषित करू नये: सुप्रीम कोर्ट म्हणाले- घोषित करण्याचे परिणाम गंभीर, बाजू मांडण्याची संधी द्या

मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

राहुल गांधींना सोडावा लागणार सरकारी बंगला: खासदारकी रद्द झाल्याने लोकसभा हाऊसिंग कमिटीने पाठवली नोटीस

विरोधकांचा ब्लॅक प्रोटेस्ट: सोनिया गांधींही आल्या काळ्या कपड्यात; स्पीकरच्या समोर काळे कपडे फडकवले, निदर्शनात TMC सह 17 पक्ष

BCCI चा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर: जडेजाचे झाले प्रमोशन, रोहित-कोहलीप्रमाणे मिळाला A+ ग्रेड; मिळणार 7 कोटी, गिल सूर्यालाही लाभ

7 एप्रिलला प्रदर्शित होणार ‘गुमराह’ चित्रपट, मृणाल ठाकूर आणि आदित्य रॉय कपूर ऑनस्क्रीन एकत्र दिसणार

जिल्हा सहकारी बँकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जिव्हारी; गद्दारांना धडा शिकवण्याच्या दिला इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधींवर केलेल्या कारवाईचा अहमदनगरमध्ये समविचारी पक्षांकडून निषेध; काळ्या फिती बांधून लोकशाही बचाव सत्याग्रह

वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करा; आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन

अहमदनगर शहरातील दिल्लीगेट येथे राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन; भाजपचे आंदोलन 

न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून काँग्रेसकडून संविधानाचा अपमान; आमदार बबनराव पाचपुते यांची टीका
 
आमदार डॉ. किरण लहामटे यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक; ग्रामस्थांचे प्रेम व आदर पाहून आमदार लहामटे भारावले

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध; नुकसानीचे अनुदान त्वरित मिळावे, यासाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन  

राज्य महामंडळाने सवलतींसह यंत्रणाही वाढवाव्यात; हेरंब कुलकर्णींची व्यवस्थापकीय संचालकांकडे  मागणी

सोनईत गावठी कट्टे विकणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

This post was last modified on %s = human-readable time difference 2:40 am

Davandi: