वसुबारस : *२८ऑक्टोबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!
२८ऑक्टोबर २०२४- वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
दिवाळी हा सर्वांचा आवडता सण असतो. या सणाला हिंदू धर्मात सर्वात जास्त महत्व आहे. या दिवाळी सणामध्ये पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे.
अशातच हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे.
कारण गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण आहे. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन देखील केलं जातं.
मात्र या सणामागचं महत्व म्हणजे घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने गाईची पूजा करण्याचं महत्त्व आहे.
आज सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपासून या सणाला सुरवात होणार आहे. तर मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 04 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.
२९ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी !
<<<<< येथे क्लिक करा >>>>
This post was last modified on October 28, 2024 10:34 am