👩❤️👨 लग्नाआधी 👩🏻💼मुलींना नक्की कोणत्या 8 गोष्टींची चिंता असते❓ वाचा‼️
👀 लग्न ठरलं कि, वधू अनेक गुंतागुंतांमध्ये अडकते किंबहुना त्याबद्दल विचार करत बसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार ज्याबद्दल मुलींना चिंता असते…
● प्रत्येक मुलीची एक मनोमन इच्छा असते की, ती तिच्या लग्नात सर्वात सुंदर दिसावी. याअनुषंगाने तिच्या मनात विविध प्रश्न सतत घोंगावत असतात.
● मुलींना एकच चिंता कायम असते कि, काही करून या आनंदावर विरजण पडायला नको जसे कि पाऊस येणे, डेकोरेशन इतर व्यव्यथा.
● आपली मासिक पाळी तारिख आणि लग्नाची तारीख सोबत असू नये. कारण असे झाले तर लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्यासारखे होईल. हा प्रश्न देखील मुलींचा चिंतेत भर घालतो.
● काही मुलींना वाटू लागते कि, लग्नापूर्वी माझी तब्येत सुधारली तर, म्हणून त्या डायटिंग देखील सुरू करतात.
● अनेकदा मुलींना वाटू लागते कि, मी लवकर लग्न करतेय का? मी लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे का? मी ही मोठी जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहे का?
● लग्न ठरले कि मुलीच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा भुंगा सुरु असतो. जसे कि, मला सासरच्या घरात प्रेम मिळेल का? ते माझी काळजी करतील का? जोडीजर साथ देईल कि नाही? माझी निवड योग्य आहे का?
● अनेकदा मुलींना वाटू लागते कि, माझ्यामुळे खूपच खर्च होत आहे. मी कसा खर्च कमी करू शकते का? याचा विचार ती करत असते.
● मुली मानसिक दृष्ट्या लग्नसाठी तयार असल्या तरी अनेकदा शारीरिक दृष्ट्या तयार नसतात. मग त्यांना वाटू लागते, मी यासाठी तयार आहे का? जर नसेल तर पतीला कसे सांगू? त्यांना माझे म्हणणे पटेल का?
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
This post was last modified on %s = human-readable time difference 11:54 am