माझी सावित्रीआई खूपचं महान..,
गाऊ किती बरं तीचं मी गुणगानं..??
पाहिले तीने स्त्रिशिक्षणाचे स्वप्नं
ज्योतीबांसह केले अथक प्रयत्नं
सावित्रीमाईंची होती वाट बिकट
चालताना माईंची झाली फरफट
स्त्री-शिक्षणासाठीची आर्थिक झळ
कसली कंबर सोसूनीया ही होरपळ
शेण – गोट्यांचा मारही सहन केला
संघर्ष सावित्रीबाईंचा कामी आला
सोडला नाही स्त्री-शिक्षणाचा वसा
म्हणून चालवीतो आम्ही पुढे वारसा
सावित्रीच्या लेकी आम्ही संघर्षही करतो
मनी सावित्रीआईचा अभिमान बाळगतो
====================
©️®️
✍️…🧚🏻♀️एंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अहमदनगर
This post was last modified on %s = human-readable time difference 12:42 pm