▪️तुम्ही आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक नहीं केले तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल.
▪️सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. यानंतर आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. सध्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये फिस द्यावी लागणार आहे.
▪️आधार कार्ड हे सर्व व्यवहारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते. जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही.
▪️एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल. आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल. होईल.
▪️आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते. लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते.
This post was last modified on April 6, 2023 11:30 am