पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 1 हजार 966 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई वितरीत करण्यात आली आहे.
अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल मुंबई मध्ये दिली.
कृषिमंत्री सत्तार यांनी काल मंत्रालयात पीक विमा योजनेची आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील ९६ लाख ९१ हजार ४१२ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांना २४१३ कोटी ६९ लाख रुपयांची भरपाई निश्चित केली आहे.
त्यापैकी १५ डिसेंबरपर्यंत १९६६ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा शेतकऱ्यांना दिल्याची माहितीही कंपन्यांनी दिली. तसेच ४४७ कोटी सहा लाख रुपयांची विमा रक्कम देणे अद्याप प्रलंबित आहे. ती उर्वरित रक्कम तत्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
तसेच “पीक विम्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या दाव्यासाठी किमान एक हजार रुपये पीक विमा कंपनीला द्यावेच लागतील,’’ असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांच्या बैठकीत दिले.
This post was last modified on January 2, 2023 5:38 am