X

नंदू काव्य

कविता कधी हसवते
कधी कधी ती रडवते
ती कधी रागाने रचते
कधी ती प्रेमाने सजते

मनाचे ते बोल लिहीते
लिहून मन हलकं करते
भावनेला ती शब्द देते
काव्यातून व्यक्त होते

शब्द शब्द गोळा करते
एक ओळ तयार होते
शेवटी यमक जुळते
नंदू काव्य असे जन्मते

कु. नंदिनी नरसिंग सोनारे,बुलढाणा

This post was last modified on January 2, 2023 12:33 pm

Davandi: