X

Health Tips : तुमच्याही पायात गोळे येतात? करा हा रामबाण उपाय .

Health Tips : जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आतापण आजाराच्या भक्षस्थानी येऊन पोहोचतो. बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदनां येतात.

◼️काही केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच.

1)एका वाटीत लिंबू रस काढून घ्यावा. हा रस पायाला चोळा. मग त्यांवर साधे मीठ चोळावे. आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून,याचि पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका.

◼️या तिन गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात व आराम मिळतो.

2)एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे.

◼️पंधरा मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल.

3)थोडा मऊ गूळ घ्या यात सुंठ पावडर मिसळून घ्यावी.आणि यांच्या बोराईतक्या सात गोळ्या करून घ्या.आणि दररोज उपाशी पोटी सकाळी एक गोळि घ्या.असे सात दिवस केल्यास कधीच पायात गोळे येणार नाही.

4)चार बदाम, एक चमचा कच्चे तिळ, आणि एक चमचा खडिसाखर, एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी एक महिना खावे.आयुष्य भर पायात गोळे येणार नाही.

5)एक पेला भर दूधामध्ये एक चमचा भरून नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्यावे, आणि यात पाच भिजवलेल्या काळ्या मनुका टाका. व सकाळी उपाशीपोटी खा.

◼️असे दहा दिवस करा. शरिरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.

6)शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून दोन वेळा खा. किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या.

◼️याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.

7)रोज सकाळी दोन डोंगरि आवळे अनशा पोटि खावे., आणि दिवसातून एकदा केळं खावे.
जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर, आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल.

8)EVION. 400 या कॅप्सुल्स घेतल्यास आलेला गोळा चटकन जातो व काही दिवस नियमित पणे गोळ्या घेतल्यास पुढे बरेच दिवस येतं नाही.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? घरबसल्या सोडवण्याचे सोपे मार्ग

हेही वाचा : महिलांना साठी! 10 हजारांची राज्य सरकारची योजना

This post was last modified on August 20, 2024 12:53 pm

Categories: आरोग्य
Tags: Health Tips
Davandi: