Student Exam Timetable Update : इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले

Student Exam Timetable Update : इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले :

Student Exam Timetable Update: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

✅ परीक्षा कालावधी: ५ ते २३ एप्रिल २०२५
✅ वेळ: सकाळी ८ ते ११
✅ निकाल जाहीर: १ मे २०२५
✅ फेरपरीक्षा: जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी

❇️ परीक्षेनंतरही शाळा बंधनकारक: यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत येत नसत. मात्र, यंदा २५ एप्रिलपर्यंत शाळेत हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.

❇️ उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालाची जबाबदारी: ५ वी ते ८ वीच्या उत्तरपत्रिका जतन कराव्या लागणार, कारण त्यांची डायट किंवा शिक्षण विभागाकडून तपासणी केली जाऊ शकते.

महाराष्ट्रशिक्षण 2025 : परीक्षा कोणत्या दिवशी, कोणता विषय

➡️ ७ एप्रिल: नववीचा इंग्रजी विषयाचा पेपर

➡️ ८ एप्रिल: पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी (पॅटर्न) परीक्षा

➡️ ९ एप्रिल: सहावीचा गणित, आठवी व नववीचा इंग्रजी (पॅटर्न) पेपर

➡️ ११ एप्रिल: सहावी व नववीचा इंग्रजी पेपर, आठवीचा गणित (पॅटर्न) पेपर

➡️ १२ एप्रिल: सर्व वर्गांसाठी इंग्रजी, हिंदी आणि गणित परीक्षा

➡️ १५ एप्रिल: सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताचा पेपर

➡️ १६ एप्रिल: सहावीच्या समाजशास्त्र, आठवीच्या गणित आणि नववीच्या विज्ञान भाग-१ ची परीक्षा

➡️ १७ एप्रिल: पाचवीच्या परिसर अभ्यास, सहावीच्या चित्रकला, आठवीच्या हिंदी आणि नववीच्या विज्ञान भाग-२ ची परीक्षा

➡️ १९ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या विज्ञान, नववीच्या गणित भाग-२ (पॅटर्न) परीक्षा

➡️ २१ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या समाजशास्त्र, नववीच्या हिंदी विषयाची परीक्षा

➡️ २२ एप्रिल: पाचवी व सहावीच्या शालेय शिक्षण, आठवीच्या चित्रकला, नववीच्या इतिहासाची परीक्षा

➡️ २३ एप्रिल: सहावीच्या इंग्रजी (पॅटर्न), आठवीच्या शालेय शिक्षण, नववीच्या भूगोलाची परीक्षा

परीक्षेचा निकाल १ मे रोजी लावावा लागणार असल्याने शिक्षकांना त्वरित उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करावा लागेल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनपूर्वी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

Maharashtra Aganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका भरती बाबत एक महत्त्वाची बातमी

Maharashtra Aganwadi Bharti 2025 :

Maharashtra Aganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका भरती बाबत एक महत्त्वाची बातमी अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यान्वये महिला- बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल

WhatsApp Image 2025 02 06 at 12.57.52 AM

SBI VACCANCY : खुशखबर ! एसबीआय मध्ये १३ हजार ७३५ जागांसाठी मेगाभरती; काय आहे पात्रता आणि पगार? जाणून घ्या

SBI VACCANCY

SBI VACCANCY : स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत साइटवर SBI लिपिक २०२४-२५ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी १३,७३५ पदे ऑफर करून मोठ्या संख्येने रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुकांनी १७ डिसेंबर २०२४ म्हणजेच आजपासून अर्ज करु शकतात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२४ आहे.

परीक्षा वेळापत्रक

▪️प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे.

▪️मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल २०२५ मध्ये होईल.

अर्ज शुल्क

▪️SC/ST/PWD/XS उमेदवारांसाठी १०० रुपये
▪️सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी ६०० रुपये

पात्रता निकष

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) प्रमाणपत्रे असलेल्या उमेदवारांनी त्यांची उत्तीर्ण तारीख पात्रता निकषांशी जुळत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • मॅट्रिकसह माजी सैनिक आणि किमान १५ वर्षांच्या सेवेनंतर विशेष भारतीय सैन्य/नौदल/वायुसेना शिक्षण प्रमाणपत्र देखील पात्र आहेत.
  • अर्जदारांना इंग्रजी भाषेची जाण असणं गरजेचं आहे.

निवड प्रक्रिया

▪️ प्राथमिक परीक्षा: या एक तासाच्या परीक्षेत इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता आणि तर्क क्षमता, एकूण १०० गुणांचा समावेश होतो.

▪️ मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षेत सामान्य/फायनॅशींयल अवेरनेस, इंग्रजी, कॉन्टीटेटीव अॅप्टीटुड, तर्क क्षमता आणि संगणक योग्यता यावरील विभाग असतात.

▪️ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रँक केले जाईल आणि केवळ मर्यादित संख्येतील टॉप-रँक असलेले उमेदवार-प्रति रिक्त तीन पर्यंत-मुलाखती फेरीत प्रवेश करतील.

अर्ज करण्यासाठी स्टेप्स

● अधिकृत वेबसाइट, bank.sbi/web/careers/current-openings ला भेट द्या.

● होमपेजवर, ‘कनिष्ठ सहयोगींची भर्ती (ग्राहक सेवा आणि विक्री) साठी लिंक शोधा.

● ऑनलाइन अर्ज करा विभाग निवडा आणि नंतर नवीन नोंदणीसाठी पर्यायावर क्लिक करा.

● अचूक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा. फॉर्म दोनदा तपासा आणि सबमिट करा.

● फॉर्मची एक प्रत तुमच्या डिव्हाइसवर तुमच्याकडे घ्या किंवा त्याची प्रिंट घ्या.

● अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या: sbi.co.in.

Railway Recruitment 2024 : रेल्वेत होणार ५८,६४२ जांगासाठी भरती! मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे जॉबबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकार तरुणांना रेल्वे नोकरीची संधी देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. तसेच रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरु असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (११ डिसेंबर) लोकसभेत म्हटलं.

अश्विनी वैष्णव म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये रेल्वेत तरुणांना अधिक नोकरीची संधी उपलब्ध करु देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.” असं रेल्वे मंत्री म्हणाले.

मोदी सरकारमध्ये रेल्वे बजेट 2.52 लाख कोटी इतकं आहे. या 10 वर्षांमध्ये 31 हजार किलोमीटर नवे रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच 15 हजार किमी रेल्वे ट्रॅकवर ‘रेल्वे कवच यंत्रणा’ कार्यन्वित करण्यात आली आहे. समृद्ध देशात जी कामं 20 वर्षात झाली आहेत, त्यासाठी भारतात फक्त 5 वर्ष लागली.” अशी माहिती त्यांनी दिली.

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

Job Update : समाज कल्याण विभागात विविध पदाची भरती

WhatsApp Image 2024 12 12 at 4.30.09 AM

Job Update :

एकूण जागा – 219 जागा

पदाचे नाव – विविध पदे

शैक्षणिक पात्रता

पदानुसार राहील

वयाची अट –

31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – पुणे/महाराष्ट्र

अर्जाची फी –

खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

अर्जाची शेवटची तारीख –

15 डिसेंबर 2024

अर्ज करण्यासाठी –

https://shorturl.at/ARLVq

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF –

https://shorturl.at/cTQWM

>>>> सीमा सुरक्षा दलात विविध जागांसाठी भरती

Apaar Id Registration : अपार आयडी रजिस्ट्रेशन कस करावे?

Apaar Id Registration

Apaar Id Registration : देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार कार्ड बनवले

यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील.

हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून वापरले जाऊ शकते.

रजिस्ट्रेशन कस करावे?

अपार आयडी बनवण्यासाठी शाळांना पालकांची परवानगी घेणे गरजेचे असते.

सर्वप्रथम तुम्हाला डिजीलॉकर खाते तयार करावे लागते.

डिजी लॉकरच्या वेबसाइटला भेट द्या किंवा अॅप डाउनलोड करा.

त्यानंतर साइन अप करा आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर ही माहिती भरा.

केवायसी पूर्ण करा.

केवायसी पूर्ण झाल्यानंतर डिजी लॉकरच्या वेबसाइटवर जा. लॉग इन करा.

Academic Bank Of Credits वर click kra

शाळा, युनिव्हर्सिटी, अभ्यासक्रम ही माहिती भरा. तुमचा अपार आयडी तयार होईल.

अपार आयडीचे फायदे

अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे.

त्यांची सर्व शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे जर तुम्हाला शाळा बदलायची असेल किंवा उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर फक्त अपार आयडी सबमिट करावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

IDBI बँक भरती: पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया

IDBI बँक भरती

IDBI बँक भरती : IDBI बँक अंतर्गत “कार्यकारी (विक्री आणि संचालन)” पदाच्या एकूण 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – कार्यकारी (विक्री आणि संचालन) – 1000 जागा

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा –

20 – 25 वर्षे

अर्ज शुल्क –


इतर सर्व उमेदवार – रु. 1050/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-

अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/

मूळ जाहिरात वाचा
https://www.idbibank.in/

IDBI बँक भरती : ऑनलाईन अर्ज करा


https://www.idbibank.in/

कृपया या नोकरीची माहिती इतर ग्रुपवर शेअर करा; आपण केलेला एक शेअर एखाद्या गरजूला नोकरीची संधी देऊ शकतो..

>>>> आला हिवाळा…तब्येत सांभाळा‼️ थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं

>>> उशीजवळ फोन ठेवणे: धोकादायक का?

>>> तुलसी विवाहानंतर लग्नाची धामधूम; 2025 मार्चपर्यंतचे शुभ मुहूर्त जाहीर

SSC EXAM RULE : दहावीची परीक्षा आणखी सोपी! अकरावीला प्रवेश मिळवणे झाले सोपे

WhatsApp Image 2024 10 23 at 10.37.51 PM 1

SSC EXAM RULE : : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात ( SSC ) महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

सुकाणू समितीने कुठल्या आराखड्याला दिली मंजुरी?

हे ही वाचा : 1 नोव्हेंबर पासून ‘या’ लोकांचे धान्य होणार बंद

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा ( SSC ) घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते. त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो. पण, पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते.

गणित आणि विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळाले तरी काळजी नाही

आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत ( SSC ) विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २०पेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषयांवर आधारित विषय घेता येणार नाहीत असा शेरा गुणपत्रिकेवर नमूद केला जाईल. तसेच गणित, विज्ञान या विषयांतील अभ्यासक्रम घ्यायचे असल्यास विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत त्या विषयांत उत्तीर्ण ( SSC ) व्हावे लागणार आहे.

माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले काय म्हणाले?

>>>> येथे क्लिक करा <<<

मुलींचे भवितव्य उज्ज्वल करा! शिक्षणात अडचण आली तर या नंबरवर संपर्क करा

मुलींना मोफत उच्च शिक्षणा

राज्य सरकारनं विद्यार्थीनींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केलं असल्यामुळं आता महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मुलींना शुल्क भराव लागणार नाही. मात्र, तरीही काही महाविद्यालये त्यांच्याकडून शुल्क वसूल करत आहेत, याविरोधात आता उच्च व तंत्रशिक्षण विभागानं कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार, जी महाविद्यालये विद्यार्थींनीकडं शुल्क मागतील त्यांच्याविरोधात तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्पलाईन तिकीट लाईन प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या आल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत खालील हेल्पलाइन क्रमांक आणि हेल्पलाईन तिकीट लाईनवर संपर्क साधावा..


http://helpdesk.maharashtracet.org

काय आहे योजना?
>>> येथे क्लिक करा <<<

Diwali Holiday : दिवाळी सुट्ट्या १४ दिवसांच्या! शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एवढ्या सुट्ट्या उरल्या

Diwali Holiday

Diwali Holiday : अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा


चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सध्या सुरु असून या परीक्षा २७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. २८ ऑक्टोबरपासून ९ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागेल. पण १० नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरु होतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना १४ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाप्रमाणे २७ ऑक्टोबरपूर्वी पहिल्या सत्राची परीक्षा संपविण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या तोंडी, प्रात्यक्षिक, सराव परीक्षा सुरु असून २५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शाळांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा संपतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

दहावीची २१ फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून

▪️ इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा: यंदा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडणार आहे. तत्पूर्वी, २४ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होईल.

▪️ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा: २१ फेब्रुवारीला सुरु होऊन १७ मार्च रोजी संपणार आहे. त्याअगोदर ३ ते २० फेब्रुवारीदरम्यान त्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार आहे.

यंदा १० दिवस अगोदर या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून त्यासंदर्भातील अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून काही दिवसांत जाहीर होईल.

‘या’ वर्षातील उर्वरित सुट्या

>>>> येथे क्लिक करा <<<<

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे