जगण्याचे ध्येय : जगण्याचं सूत्र चुकतंय का…..?

जगण्याचे ध्येय

जगण्याचे ध्येय : जगण्याचं सूत्र चुकतंय का…..?

भाऊ काय बहीण काय
नुसता फापट पसारा,
कोण कोणाला विचारतंय
कुणालाही विचारा…

कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना,
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येईना…

संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही,
बैठकीत किंवा ओसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही…

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी,
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,
यातच हल्ली माणसाचा
होत आहे The End…

Luxury मधे लोळतांना
फाटकं गाव नको वाटतं,
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं…

उच्च शिक्षित असूनही
माणूस आज Mad वाटतं,
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं, धोतर Odd वाटतं…

सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय Posh असतील?
पार्लर मधून आणल्या सारखे
चिकणे चोपडे कसे दिसतील…?

उन्हा तान्हात तळणारी
माणसं काळी पडणारच,
गरिबीनं गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच…

जगण्याचे ध्येय : कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास,
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास…

पात्र कितीही मोठं झालं
तरी गंगेचं मूळ विसरू नये,
सुख असो का दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये…

दिसण्यावर प्रेम करू नकोस
आपलं समजून जवळ घे,
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये…

कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास
माणसावर प्रेम करायचं शिक,
नाहीतर मानसिक आरोग्यासाठी
दारोदार मागत फिरशील भीक….

दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही,
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही…

जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका,
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका…!

हे ही वाचा : UPSC निकाल लागला तेव्हा, 551 रँक वाला मेंढ्या राखत होता.. संपूर्ण मुलाखत

जगण्याचे ध्येय : मी का बोलू?
मी का फोन करू?
मी का कमीपणा घेऊ?
मी का नमते घेऊ?
मी का नेहमी समजून घ्यायचं?
मी काय कमी आहे का?”
असे बरेच सारे “मी” आहेत,
जे आयुष्यात विष कालवतात…

म्हणून, अरे अतिशिकलेल्या माणसा मी पणा सोड आणि
नाती जोड़…

जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर, तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत !

जगण्याचे ध्येय : काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही !

Happy Women’s Day : आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक ‘तिला’ आजच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

happy womens day

Happy Women’s Day : कुठे शोधायचा महिला दिन
आजीच्या खुरप्यात
आईच्या स्वयंपाक घरात
की ताईच्या कांदेपोहे कार्यक्रमात .?

कुठे शोधायचा महिलादिन
आईच्या वात्सल्यात
पत्नीच्या पाठिंब्यात
बहिणीच्या मायेत की
प्रेयसीच्या प्रेमात..?

कुठे शोधायचा महिलादिन..?
शिवबांच्या जिजाऊत
ज्योतिंबाच्या सावित्रीत
गोपाळरावांच्या आनंदीबाईत की
शंभूराजांच्या येसूत..?

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक ‘तिला आजच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कुठे शोधायचा महिला दिन
चुल आणि मुलच्या संकल्पनेत की’
अवकाशात गेलेल्या सुनिता ,कल्पनेत..?

कुठे शोधायचा महिला दिन ..?
गावात दिसणाऱ्या पती पिता पंचायतीमध्ये
की इंडिया = इंदिरा या समीकरणात..

कुठे शोधायचा महिलादिन ..?
Missing women मधे हरवलेल्या
कळ्यांमध्ये की उमलूनही असुरक्षित कळ्यांमध्ये..?

कुठे शोधायचा महिलादिन.?
आजही आर्थिक स्वातंत्र्य नसलेल्या
महिलेत की आर्थिक सुबत्ता असून glass ceiling चा बळी पडलेल्या high class women मध्ये..?

कुठे शोधायचा महिला दिन .?
कुटुंबासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फेरणार्या कुटुंब वत्सल स्त्रीमध्ये की
घर आणि नोकरी दोन्ही बाजू
पेलणार्या रणरागिंनीमध्ये..?

कुठे शोधायचा महिलादिन ..?
गर्भाशयातून “बाईपण” घेऊन घेणाऱ्या बालिकेत की आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांची मन जपून संसार करुन थकलेल्या थरथरणार्या हातात…

महिलादिनाचा शोध घेतांना कधी होते घुसमट जीवाची ..
कधी वाटते भिती आजची असुरक्षितता पाहता..
कधी होते चीडचीड तिची क्षमता असुन डावललं जातं तेव्हा ..
कधी दाटतो कंठ तिची उंचच भरारी पाहून..
या सर्व कोलाहालातून
पुरुन उरतं ते
बाईचं बाईपण
कालपण ,आजपण आणि उद्यापण..✨
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨
जगणं साजरं करणारी स्त्री समाजाचं मोठ्ठं देन आहे ,let’s be it💯
You deserve to be happy💫
महिला दिन विशेष

Ideal life : आदर्श जीवन जगण्यासाठी

WhatsApp Image 2024 08 13 at 6.06.10 AM

Ideal life : येथे वाचा
☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.
☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.
☞ (०४) आभार मानायला विसरू नका.
☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
☞ (०६) सतत हसतमुख रहा.
☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसू नका.
☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवू नका.
☞ (११) कृती पूर्व विचार करा.
☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहू द्यात.
☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.
☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.
☞ (१७) विचार करून बोला.
☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेऊन खरी मैत्री गमाऊ नका.

कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,


आज परत एकदा नकळत
मुंगी तळ्यात पडली
● स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली
● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला
● झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला
● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
● मुंगी असहाय्यतेचा मुळे गतप्राण झाली
● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं
★ पारधी येणार हेच विसरून गेलं
★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला
•कबुतर आणि मुंगी दुर्दैवी पणाने गेले.
【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】
मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.

_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.
अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.

सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा…

पुढील लेख वाचण्यासाठी >>> येथे क्लिक करा <<<

Kavita2024 : माझी लाडकी बहीण

माझी लाडकी बहीण

Kavita2024 : लाडाची बहीण

शासनाला बहिणीची
आठवण आली
लाडा कौतुकाची
सर्वांची लाडली

मध्यप्रदेशासोबत आपले
तसे फार जुने नाते
बँकेत मामाने भाचीसाठी
उघडून दिले होते खाते

त्या खात्यात दर महिन्याला
पाठवतात पंधराशे धनराशी
राहिले पाहिजे सर्व सुखी
बहिण असो की भाची

हेही वाचा : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाले मोठे बदल

ठरविले आहेत भावाने
बहिणीला द्यायची साथ
ही योजना होणार सुरु
आपल्या महाराष्ट्रात

भावाने या योजनेला
दिले बहिणीचे नाव
सुरुवातीला नियमामध्ये
वाटत होता भेदभाव

बहिण तर बहीण असते
गरीब असो की धनवान
आदर सत्कार करावा तर
सर्वांचा सम-समान

हेही वाचा : कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत तुम्हाला भेटतील का पहा

शासनाच्या तिजोरीवर
पडणार अधिक भार
थोडा का होईना
मिळेल कुटुंबाला आधार

शेतकरी भावाकडेही शासना
आता तरी ठेवशील लक्ष
शेतात बांधावरती पोशिंदाच्या
येऊन पाहशील प्रत्यक्ष

शेतमालाला अन्नदात्यांच्या
भाव देशील योग्य
जगतील सुखामध्ये जीवन
असे लाभू द्या सौभाग्य

बाई पण भारी देवा : सगळ्यांसाठीच एक सिनेमा, फक्त महिलांसाठी नाही

WhatsApp Image 2023 07 30 at 9.51.15 PM

एका महिलेने लिहिलेला एक छोटासा लेख!!!!!!!!!!!
बाई पण भारी देवा काल पिक्चर पाहिला गेले सगळे म्हणाले बायकांचा पिक्चर आहे म्हणून काल बघायला गेले तर बायकांचे जीवन दाखवलेलं
एक बाई कसं जीवन जगतीये मग बायकांना वाटलं बाई वरच पिक्चर आहे मग चला !!!

पुरुषांनी ही बाई पण भारी देवा पाहिला पाहिजे !!!!!!

अरे बाई वर म्हणून बायकांनीच जायचं का प्रत्येक बाई प्रत्येक बाईला माहिती एक बाई काय जीवन जगतीये…. प्रत्येक दिवसाच्या कसा संघर्ष करतीये? प्रत्येक प्रॉब्लेम्सला ती कशी सामोरे जाती? बायकांचा पिक्चर म्हणून बायकांनी जायचं का

प्रत्येक बाईला माहिती बाई काय जीवन जगते!
प्रत्येक दिवसाचा कसा संघर्ष करतीये!
प्रत्येक प्रॉब्लेम्सला ती कशी सामोरे जाते..
बायकांचा पिक्चर आहे म्हणून बायकांनी जायचं का?

पिक्चर बघून आयुष्यात असंच चालू आहे म्हणून रडत बसायचं !!!

बाई पन भारी देवा : सगळ्यांसाठीच एक सिनेमा, फक्त महिलांसाठी नाही

मला असं वाटतं प्रत्येक पुरुषाने तो पिक्चर बघायला हवा …!
प्रत्येक पुरुषाला कळू द्या की बायका कशा जीवन जगतात , कसा संघर्ष करतात ,
प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यांना घेऊन पिक्चर दाखवा त्यांनाही कळू द्या ,

एक बाईच जीवन कस आहे ? काय जगतात त्या स्वतःसाठी ? किती दिवस आहे स्वतःसाठी?

हे फक्त मनाला कळू नका देऊ आपण ज्यांच्यासाठी जगतोय त्यांना कळू द्या आपन काय जीवन जगतोय? आतापर्यंत काय जगत आलोय

बाई पन भारी देवा : प्रत्येकाने पाहिला पाहिजे असा सिनेमा !!!!!!

मला असे वाटते की प्रत्येक बाईने आपल्या स्वखर्चातून आपल्या नवऱ्यांना पिक्चर दाखवावा

काही चुकलं असेल तर माफी असावी

आपलीच ……..

आठवणी : आमचाही एक जमाना होता.

WhatsApp Image 2023 07 26 at 5.49.27 PM

आमचाही एक जमाना होता. पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. पुढे ६/ ७ वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे. जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.

सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.

☺️ 😊 ☺️ 😊 ☺️ पास/ नापास हेच आम्हाला कळत होतं. % चा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.

😆 🥹 😆 🥹 😆 शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची. कारण” ढ” असं हीणवलं जायचं.

🤣 🤣 🤣 🤣 🤣

पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता.

😏 🥳 😏 🥳 😏 कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.

😳 😳 😳 😳 😳

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा.

🤗 🤗 🤗 🤗 🤗 वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 😝 😜 😝 😜 😝

1987 ते 1999

आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते. 🙂 🙃 🙂 🙃 🙂 कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही.

WhatsApp Image 2023 07 26 at 5.50.24 PM

हे ही वाचा : – मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

🤭 🫢 🤭 🫢 🤭

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना, कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा ‘ ईगो’ कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला‘ ईगो’ काय असतो हेच माहीत नव्हतं.

😀 😄 😀 ☺️ 😄 😀 😄 मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, ‘ चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून.

🙂 😉 🙂 😉 🙂 बिनचपला, बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.

हे ही वाचा : – याला जबाबदार कोण  आपण नाही तर कोण…..

☺️ 😊 ☺️ 😊 ☺️ ☺️ 😊 आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करूनटाकायचे.

सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काहीअपमानास्पद आम्हाला वाटायचंनाही.कोणी दुसरा फटाके फोडत असेल त्याच्या मागे मागे धावायचो.

😉 😉 😉 😁 😉 😉 😉 आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला आय लव यू’ म्हणणं माहीतच नव्हतं.

😘 😘 ❤️ 😘 😘

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय तर काही’ काय माहीत.?

शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र, कुठे हरवलेत ते.!

WhatsApp Image 2023 07 26 at 5.51.02 PM

😂 😂 👍 😂 😂 आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो.

😉 🙄 😉 🙄 😉 कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच आणि चटणी भाजी शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.

😘 😘 ❤️ 😘 😘

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत. जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार ,,,,,,,,,,,,,,,,,,

😃 😃 😃 🌹 😃 😃 😃 आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक’ जमाना होता.

TOP News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● यंदा अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं उशिरा आगमन होणार, स्कायमेट वेदरची माहिती; तर केरळमध्ये 1 जून ऐवजी 4 जूनला मान्सून दाखल होणार – भारतीय हवामान खात्याचा अंदाज

● सततचा पाऊस हा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय.

● वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय.

💁‍♂️ “बस्ता”
📲 https://vishwakavitanche.com/2023/05/11/लावणी-बस्ता/

● शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ; आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25 हजार रुपये.

● आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय देण्यात विनाकारण विलंब करणार नाही, पण त्याआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य.

● मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये द्या, मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस.
💁‍♂️ “उन्हाळा”
📲 https://vishwakavitanche.com/2023/05/11/उन्हाळा/

● कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा; वारकरी संप्रदायाची मागणी.

● पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या डॉ. प्रदीप कुरुलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

● आता मुंबई-गोवा प्रवास होणार हायस्पीड; महाराष्ट्राला मिळणार चौथी ‘वंदे भारत’ ट्रेन.

● IPL 2023 : रोमहर्षक सामन्यात लखनौचा मुंबईवर अवघ्या 5 धावांनी विजय.

💁‍♂️ “आठवण”
📲 https://vishwakavitanche.com/2023/05/11/विषय-आठवण/

मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

WhatsApp Image 2023 05 13 at 5.07.13 PM

मुलीची आई असणं किती भाग्याचं!! खूप आवडली पोस्ट

आई ग्ग. चटका लागून जीव कळवळला. इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली. आई भाजलं ना तुला फुंकर घालत क्रीम लावली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

आई, आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे तू पिल्लुला घेतलंय ना. ओझं होईल तुला छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

पिल्लू रडू नको ना. आई येते आत्ता. अले अले. गप बश. गप बश. माझ्या माघारी ती आई झाली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

चप्पल नाही घातलीस आई तू?, राहू दे. मी जाईन स्कूल बस पर्यंत वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या तिला मायक्रोव्हेव हवा आहे. बुक करून ठेव हां. आणि साडी आन पिकॉक ग्रीन कलरची तिला हवी होती कधीची आईची आवड तिला कळाली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते. शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिला लक्षात आली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत आईची गरज तिने ओळखली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

हे ही वाचा : – स्री चे जीवन चरित्र

दादा, तू फराळाचं समान न्यायला हवं होतं. किती आनंदाने केलं होतं तिने तेवढ्याच ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली. आईची माया तिला उमजली. कधी मोठी झाली कळलंच नाही.

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला, ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली, शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली, कधी मोठी झाली कळलंच नाही.

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून’ गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय. घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको. डबा पाठवतेय दोघांचाही, अजुन काय काय अन् काय काय लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..

लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो, आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो.

मुलगा हा दिवा असतो वंशाचा पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची.

हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी, परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही.

सर्व आईना व लेकीना समर्पित

🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही व संविधान वाचवा…!!!

🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे …!!!

🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा…!!!

🌺”प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!!🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

याला जबाबदार कोण  आपण नाही तर कोण…..

WhatsApp Image 2023 04 27 at 8.47.06 PM

इथे तिथे कचरा नाही त्याचा निचरा
प्लास्टिकचा कचरा  हा तर प्लास्टिकचा कचरा  रोगराई पसरते पसरतात विषाणू
आणू थोडे चिप्स अन् आणू थोडे ड्रिंक्स आजार हीच याची निशाणी
याला जबाबदार कोण  पण नाही तर कोण

नद्या झाल्या घाण भारताची शान समुद्रामध्ये आलं प्लास्टिकचे उदान  लंपि आला, फ्लू आला ,
आला आता कोरोना  कोरोना ने केली आता माणसाची दैना
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

गाव गेले आता शहरांची वस्ती 
उद्योगांच्या जाळ्यात सिमेंटची वस्ती
नदी झरा बंद झाले इथे वाहतात गटारे
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

चंदनाचा वास गेला दूर दूर
पृथ्वीवर झाला फक्त धूर धूर
माकडातून माणसाचा जन्म झाला नवा
मोबाईल वरून माणसाने फिल्टर केला नाव
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

मुलगा पाहिजे वंशाचा दिवा सासूबाई म्हणते मुलगाच हवा
त्याचा नेहमी वेगळा असतो थाट
लावतो तोच पणतीची वाट
याला जबाबदार कोण  आपण नाहीतर कोण

पृथ्वीवर जागा फक्त 29 टक्के भारताची लोकसंख्या 100% 
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण 

चंद्रावर माणूस गेला चार वेळा अजूनही पाळतात अमावस्याच्या वेळा 
जनावरांना मारून खातात नळी पानसरे दाभोळकर यांचेच बळी  याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण 


दवाखाने चार अन शाळा आहे एक
काही डॉक्टर आहेत फेक तर काही शिक्षक नेक  शाळा झाले बंद चालू झाले क्लासेस
मराठी बोलता येत नाही धरून इंग्रजीची कास शिक्षणाचा चालला सर्व बोगस प्रवास
मी नाही तू नाही तू नाही मी
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

रस्ते कमी खड्डे जास्त वय आता 100 पेक्षा 50 जास्त  24 तासात 24 ठिकाणी होतात अपघात
पाच वर्षात सरकार किती वेळा बदलतात
माणसं झाली  व्यस्त अन सरकार झाला भ्रष्ट
फास्ट फूड आले आणि जीवन झाले फास्ट
यामुळे बॉडीचा एक एक पार्ट होतो लाॅस्ट
याला जबाबदार कोण आपण  नाहीतर कोण

प्लास्टिक झाले स्वस्त आणि पृष्टी झाली नष्ट झाडे लावू झाडे वाचू हाच दिला मंत्र औद्योगीकरणात येतात नवी-नवी तंत्र शेतकरी राजा होतो झाला आता भिकारी भविष्यात आणण्यासाठी फिरू लागला दारोदारी याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण 

ऋतुमान बदलत बदलते निसर्गचक्र
क्षणात पडतो पाऊस तर क्षणात पडते ऊन
याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण

घर माझे गाव माझे शहर माझे राज्य माझे देश माझे जग माझे पृथ्वी माझी याला वाचवणार कोण याला वाचवणार कोण याला वाचवणार कोण आपण नाही तर कोण  आपण नाहीतर कोण 

Time:अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा: अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त आणि पौराणिक महत्व:

WhatsApp Image 2023 04 22 at 6.43.45 AM

💁🏻‍♂️ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

WhatsApp Image 2023 04 22 at 6.46.53 AM

💫 अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त :

पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे.

तृतीया तिथी प्रारंभ – 22 एप्रिल सकाळी 07:49 पासून

तृतीया समाप्ती – 23 एप्रिल सकाळी 07:47 पर्यंत

WhatsApp Image 2023 04 22 at 6.48.33 AM

🤔 अक्षय्य तृतीयेचं महत्त्व काय? हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर, दागिने, कपडे, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो.

🛕 अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व : अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला असल्याचं म्हटलं जातं.

हे ही वाचा🛕 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षयतृतीया. 🔰मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय❓ समजून घेऊयात.
👇 येथे सर्वांनी नक्की वाचा 👇
https://davandi.in/2023/04/21/साडेतीन-मुहूर्त-म्हणजे-क/

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे