Weather Alert : सावधान तो परत येतोय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अन गारपीटीचा इशारा

WhatsApp Image 2023 03 13 at 4.16.41 PM 1

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढचा आठवडादेखील राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.

राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे आधीच शेतकरी हैराण झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून देशाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी क्लायमेट ट्रेंडला दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळात मध्यपूर्व आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उत्तर मैदानी भागातही काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असेल. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांमध्ये उष्णतेच्या वाढत्या तणावामुळे यंदा मान्सूनपूर्व सरी या नियोजित वेळेआधीच सुरू झाल्यात. त्यामुळे संपूर्ण देशाला या हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे.

सामान्यतः मान्सूनपूर्व हवामान हे मार्चच्या उत्तरार्धात सुरू होतं. परंतु, फेब्रुवारीमध्येच तापमानामध्ये अधिक उष्णता वाढल्यामुळे यंदा लवकरच अवकाळी पावसाला सुरू झाली.

दरम्यान, आगामी काळामध्ये देशावर दोन चक्रीवादळांचं सावट असणार आहे. एक चक्रीवादळ पूर्व मध्य प्रदेशात पाहायला मिळेल तर दुसरं तेलंगणा आणि लगतच्या उत्तर आंध्र प्रदेशात पाहायला मिळेल. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये आद्रतेमुळे दोन्ही प्रणाली अधिक तीव्र झाल्या आहेत.

मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. यावेळी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या औषधी हवामानामुळे पिकांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्यात.

या महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि गडगडाटामुळे राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं.

पावसामुळे नुस्कान होणारे कामे लवकरच करून घ्या

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 13/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

कृषिपंपांना दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व रोहित्रांना सौरऊर्जा पुरविली जाणार आहे, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

केंद्र सरकारचा विरोध;
समिलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्व वैयक्तिक कायद्यांनुसार एक पुरुष आणि एक स्त्री यांच्याच विवाहाला मान्यता आहे,

भारतातील लोकशाहीवर शंका हा देशाचाच अवमान; पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

India vs Australia 4th Test Series कसोटी क्रिकेटमध्ये तीन वर्षांहूनही अधिक कालावधीपासूनचा शतकाचा दुष्काळ विराट कोहलीने अखेरीस संपुष्टात आणला.

बोगस कर्ज प्रकरणांद्वारे आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार; राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अडचणीत
मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत संचालक करतो, नोकरी लावतो, असे आमिष दाखवून बोगस कर्ज प्रकरणे

आमदार बच्चू कडू म्हणाले की, “काहीजण आम्हाला गद्दार म्हणतात. बिलकूल आम्ही गद्दार आहोत. आम्ही नेत्यांचे गद्दार आहोत, जनतेचे नाही. असं म्हणत कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे

आजपासून सरकारी कर्मचारी संपावर; जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची मागणी; मुख्य सचिवांच्या बैठकीवर संघटनांचा बहिष्कार

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. राज्याच्या ‘सीएम’चा नवीन अर्थ लावला जाणार आहे. ‘सीएम’ म्हणजे ‘करप्ट माणूस’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. हे सरकार संविधान बदलणार आहे. त्यामुळे सावध होणं गरजेचं आहे, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.

WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, कर्णधार हरमनप्रीतच्या वादळी खेळीमुळं यूपी वॉरियर्सचा पराभव

ODI Cricket: रवी शास्त्रींचे एकदिवसीय क्रिकेटबद्दल मोठं वक्तव्य; आयसीसीला सल्ला देताना म्हणाले, ‘भविष्यातील वनडे क्रिकेटचे अस्तित्व वाचवता येईल.…

जम्मू-काश्मीरमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना: महिलेच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

एलआयसीचे नवे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती: शासनाने MR कुमार यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नाही, मोहंती सद्या कंपनीत MD

दिवाळखोरीत निघालेल्या श्रीलंकेतील 40 लाख विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या छपाईसाठी भारताची 8 कोटींची मदत..!

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: छत्रपती संभाजीनगरमधील 6 जण ठार; पाऊण तास मदत न मिळाल्याची प्रत्यक्षदर्शिंची माहिती

भाजप खासदाराचे वक्तव्य– राहुल गांधींना देशाबाहेर हाकलून द्या!: प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या- परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल: दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, एकाला अटक

नारायण राणेंचे मंत्रिपद 2 महिन्यात जाणार: आमदार वैभव नाईक यांचे भाकीत; म्हणाले – भाजपला आता राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त: विराटच्या 186 धावा, टीम इंडिया 571 धावांवर सर्वबाद; ऑस्ट्रेलिया – 3/0

WPLमध्ये मुंबईचा सलग चौथा विजय: UP वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव: हरमनची फिफ्टी, इशाकने घेतले 3 बळी

मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरवर तयार होणार बॉलिवूड चित्रपट, निर्माते आनंद कुमार यांची घोषणा

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM


🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀

👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀

👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठी
आम्ही कटिबध्द आहोत.

📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत
🤝अशीच साथ राहूद्या‼️

💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे
📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇
👉[ http://davandi.in ]

📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन

💁‍♂️ 📢दवंडी डिजिटल🪀 मॅगझीन वर खालील माहिती मिळेल 👇

📻ब्रेकिंग न्यूज
💰बँकिंग क्षेत्रातील अपडेट
🌎जॉब अपडेट (online wfh)
👨🏻‍✈️सरकारी नोकरी विषयी माहिती
📊शेअर मार्केट विषयी अपडेट
🌱सर्व शेतकरी योजना माहिती
🌎सर्व ऑनलाईन योजना माहिती
👨🏻‍🏫विद्यार्थ्यांसाठी नवीन करिअर मार्गदर्शन
📝सर्व ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती

💁🏻‍♂️ या 📢दवंडी मॅगझीन वर आपल्या
🏡घरातील प्रत्येकासाठी महत्वाचे अपडेट राहतात – चांगल्या अपडेट साठी आजच जॉईन करा*👇
💁🏻‍♂️ 📢दवंडी मॅगझीन जॉईन करा👇
👉 [ http://davandi.in ] ]

💥 सुवर्ण संधी‼️ 👌लय भारी गाव कारभारी🙏

📢 एक गाव एक प्रतिनिधी नेमणे आहे‼️

🗞️ न्यूज 🎓जॉब 🎥माहिती 🎼मनोरंजन सोबतच 💷 पैसे कमवण्याची 💫सुवर्णसंधी

👍 अधिक माहिती मिळण्यासाठी चॅनेल ला
🔔 Subscribe करा👇

🎥https://youtube.com/channel/UCXPrglhlmOM0Htek_noUASA

👍🔔 Subscribe करा👆

💁🏻‍♂️ _हि माहिती इतरांना पण🤳 शेअर करा
🙋‍♂️ 👍📢दवंडी ला साथ द्या 🤝

(🙏🏻 कृपया हा मेसेज आपल्या सर्व मित्र,। नातेवाईक व आपल्याकडील सर्व🪀 व्हॉट्सअप ग्रुप्सवर जरूर शेअर करा.)

🤝 धन्यवाद..🙏🏻

🎯 दवंडी जॉईन करण्यासाठी क्लिक करा👇
👉[ http://davandi.in ]

==========================
🎯📢 दवंडी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क करा📲 9975167791

📢दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 12/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? धाडीनंतर ईडीने बजावलं समन्स
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरी ९ तास चौकशी केली

धक्कादायक! इमारतीवरून लोखंडी सळई रिक्षावर पडली, माय-लेकिचा मृत्यू; जोगेश्वरीतील घटना

GGW vs DCW: शफाली वर्माने गोलंदाजांना फोडला घाम, वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर एकतर्फी विजय

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप;

अतिवृद्ध, विकलांगांसाठी घरून मतदानाची सुविधा; कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच प्रयोग

“माझं तुम्हाला ओपन चॅलेंज, मी MIDC आणली, तुमच्या ऐपतीने…” धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना आव्हान
धनंजय मुंडे म्हणाले की, “मी आपल्याकडे एमआयडीसी आणली आहे. तुम्ही आता तिथे एखादा मोठा प्रकल्प आणा.”

अवकाळी पाऊसाचा २५० हेक्टरला फटका, वाढलेल्या तापमानामुळे आंबा पिक संकटात
तापमान वाढल्यामुळे आंब्याची फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली आहे. आंब्यावरील संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी; नितीन गडकरी यांची माहिती

राज्यभर उन्हाच्या झळा; सोमवारनंतर पुन्हा पावसाच्या सरी

चीनच्या लोकप्रतिनिधीगृहाने शनिवारी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांचे जवळचे सहकारी ली कियांग यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब केले.

अवघ्या दोन महिन्यांत मोदींचा कर्नाटकात पाचवा दौरा, सत्ता कायम राखण्यासाठी आटापिटा
गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान मोदी हे उद्या पाचव्यांदा राज्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ किंवा उद्घाटने त्यांच्या हस्ते पार पडतील.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका :शुभमनचे संयमी शतक
India vs Australia 4th Test Seriesसर्व प्रारूपांत चांगल्या लयीत असलेल्या गिलने २३५ चेंडूंचा सामना करताना १२८ धावा केल्या ज्यामध्ये १२ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.


इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष मोहित जोशी यांचा काल राजीनामा, आता ते टेक महिंद्रामध्ये सीईओ व मॅनेजिंग डायरेक्टर पदावर रुजू होणार.

देशातील पहिला ‘ट्रान्स टी स्टॉल’ आसाममध्ये सुरु. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर उभारला पहिला ‘ट्रान्स टी स्टॉल’, तृतीयपंथीयांच्या सशक्तीकरणासाठी पूर्वोत्तर रेल्वे विभागाने घेतला हा निर्णय निर्णय.

सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती नीती आयोगाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याव्हे आवाहन देखील नीती आयोगाने केकेले आहे.

भारतीयांसाठी अमेरिकेतील जॉब व्हिसा मिळणं सोपं होणार आहे कारण सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आले आहे.

अमेरिकेमधील सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार, दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो. त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून डेमोक्रॅटिक पक्ष्याचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि GOP चे लॅरी बुशान यांनी हे विधेयक सादर केले आहे.

राज्यात उन्हाळ्यानंतर दुष्काळ येण्याचे अमेरिकेची हवामान अभ्यासक संस्था ‘नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ ने सांगितले आहे. कारण हिंदी महासागराच्या तापमानातील तफावत दाखवणारा घटक ‘एल निनो’ चा प्रभाव वाढणार आहे.

सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी: दापोलीतील कथित साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी रामदास कदमांच्या बंधूच्या अडचणीत वाढ

आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका!: ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर, म्हणाल्या- किती त्रास देणार?

CM एकनाथ शिंदे यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना: नव्या वादाला तोंड; मनसे आमदार राजू पाटलांनी मनाची तरी चाड ठेवा म्हणत सुनावले!

पत्नीच्या हत्येच्या आरोपीची 40 वर्षांनी निर्दोष सुटका: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली उच्च न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा

निती आयोगाकडून गोमूत्र-शेणाचा अहवाल: म्हटले- शेतीत वापर वाढविण्याची गरज, रासायनिक खते मानवी आरोग्यास हाणीकारक

62 वर्षांनंतर ऑस्करच्या रेड कार्पेटचा रंग बदलला: 1961 पासून सुरु असलेली ऑस्कर अवॉर्डची ओळख बदलणार

2046 मध्ये नष्ट होणार जग?: पृथ्वीवर धडकणार विशाल लघुग्रह, NASA ने जारी केला धोक्याचा इशारा!

भारत पहिल्या डावात 289/3: 14 महिने आणि 15 डावांनंतर कोहलीचे अर्धशतक, गिलचे वर्षातील 5 वे शतक

WPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 10 गडी राखून मिळवला विजय: 7.1 षटकांत 106 धावांचे लक्ष्य गाठले;शेफालीचे फिफ्टी, कॅपने घेतले 5 बळी

टेम्बा बावुमाने सात वर्षांनंतर ठोकले शतक: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 287/7

कार्डियाक अरेस्टनेच सतीश कौशिक यांचा मृत्यू: पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा, फार्म हाऊसच्या 7 तासांच्या CCTV फुटेजचा तपास होणार

खतरनाक! २८ चेंडू…१० चौकार अन् ५ षटकार, WPL मध्ये शफाली वर्माने ठोकल्या ७६ धावा,

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

💁🏻‍♂️ खालील लिंक जॉईन करा👇
📲 [ https://davandi.in ]

📲https://t.me/joinchat/AAAAAFTAZGcUVi1gPndsGQ

🔔सदस्य व्हा/सबस्क्राईब करा👇

🎥 https://youtube.com/channel/UCXPrglhlmOM0Htek_noUASA

📢 जाहिरात संपर्क📲 9975167791

PM Kisan 13th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 हप्त्याची प्रतीक्षा संपली आज खात्यात जमा होणार 2 हजार रुपये

WhatsApp Image 2023 02 27 at 11.04.59 AM

शेतकरी PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. याच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक मोठी घोषणा करणार आहेत.

PM Kisan 13th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे पैसे जमा केले होते. अशातच आता शेतकरी या योजनेच्या 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

कारण केंद्र सरकारकडून आज खात्यात 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. परंतु, यातील काही शेतकऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. शेतकऱ्यांनी जर अजूनही eKYC केली नसेल तर त्यांना या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान तेथील हायटेक रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करून ते किसान सन्मानचा PM किसान सन्मान निधीचा नवीन हप्ता जारी करणार आहेत.

यापूर्वी 17 ऑक्टोबर 2022 रोजी नरेंद्र मोदी यांनी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16,000 कोटी रुपये जारी केले होते. त्यानंतर ही रक्कम 8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली.

सरकार आज जारी केला जाणार हप्ता

तुम्हाला आता तुमच्या हप्त्याची स्थिती स्वतः तपासता येईल. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पीएम किसान http://www.pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागणार आहे. इथे गेल्यावर तुमच्यासमोर फार्मर्स कॉर्नर येईल. त्यावर क्लिक करून तेथे Beneficial Status चा पर्याय निवडा.

तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून Get Data वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती समजेल. जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाइनचाही आधार घेऊ शकता.

तुम्हाला डायरेक्ट मंत्रालयाशी संपर्क साधता येतो:-

  • असा करा मंत्रालयाशी संपर्क :-
  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261
  • पीएम किसान लँडलाइन नंबर- 011-23381092, 23382401
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- 011-24300606
  • पीएम किसान आणखी एक हेल्पलाइन- 0120-6025109
  • ई-मेल आयडी- [email protected]
  • बंधनकारक आहे eKYC

या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, सर्व शेतकऱ्यांना असे सूचित करण्यात आले आहे की आता 13वा हप्ता मिळवायचा असेल तर ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर ते त्वरित करून घ्या. यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.

eKYC करूनही पैसे आले नाही तर करा हे काम

या योजनेअंतर्गत तुमची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादी तपासली पाहिजे. लाभार्थी यादी तपासत असताना तुमचे नाव दिसत नसल्यास तुमच्या अर्जात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. हे दुरुस्त करण्यासाठी, तुम्ही पोर्टलवर तसेच जवळच्या कृषी सहाय्य केंद्रावर ऑफलाइन जाऊ शकता.

अशी पहा स्थिती

  • सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
  • आता होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता ड्रॉप डाउन वर क्लिक करा.
  • त्यात तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागणार आहे.
  • जर तुमचे लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसेल तर अर्जात काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे.
  • ते तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सहाय्य केंद्राला भेट देऊन ऑफलाइन किंवा पोर्टलच्या मदतीने त्रुटी दूर करू शकता.

Agriculture News : कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा

WhatsApp Image 2023 02 13 at 5.41.25 PM 1

Agriculture News : भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत या वर्षाअखेर देशात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. निश्चितचं ही देशाच्या विकासासाठी एक गरजेची बाब असून यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा हा वैयक्तिक अधिकार आहे.

मात्र, प्रत्येक क्षेत्रात वैश्विक पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदुस्थानात बळीराजा मात्र आजही नानाविध अशा संकटांमध्ये गुरफटलेला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी ढगाळ हवामान, तर कधी वादळी वारे यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे नेहमीच शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. या नैसर्गिक संकटाचा सामना करत बळीराजा आपलें शेती पिके वाचवण्यासाठी मेहनत घेत असतो.

मात्र या पिकांच्या पोषणासाठी आवश्यक खतांच्या उपलब्धतेसाठी देखील शेतकरी बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते. शेतकऱ्यांना नेहमीच खतटंचाईचा सामना करावा लागतो.

मात्र अनेक प्रसंगी अस आढळून आल आहे की दुकानदार आपल्या स्वार्थासाठी खतांचा स्टॉक उपलब्ध असतानाही मुद्दामहुन खतटंचाई घडवून आणतात. जेणेकरून, दुकानदारांना महागड्या दरात खतांची विक्री करता येईल.

निश्चितच, प्रत्येकचं दुकानदार असं करत नाही. परंतु अनेक दुकानदार अशा पद्धतीने कृत्रिम खत टंचाई करतात आणि यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते. मात्र आता शेतकरी बांधवांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्रत्यक्षात आपल्या जवळील खताच्या दुकानात किती खताचा स्टॉक उपलब्ध आहे हे जाणून घेता येणार आहे. यामुळे जी काही कृत्रिम खत टंचाई दुकानदारांच्या माध्यमातून केली जाते यावर आळा घालण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्यापूर्वीच खताच्या दुकानात स्टॉक उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळू शकणार आहे. विशेष बाब म्हणजे हे ॲप्लिकेशन भारत सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे हे ॲप्लिकेशन पूर्णतः सुरक्षित असून यामध्ये दिलेली माहिती ही योग्यच राहणार आहे.

या पद्धतीने चेक करता येणार खत दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे

शेतकरी मित्रांनो, आपल्या जवळील खतांच्या दुकानात खताचा साठा शिल्लक आहे की नाही हे पाहण्यासाठी आपणास भारत सरकारच्या खत विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. https://www.fert.nic.in/ या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आपणास खतांच्या साठाची माहिती उपलब्ध होणार आहे.

या वेबसाईटवर गेल्यानंतर Fertilizer Dashboard (फर्टीलायझर डॅशबोर्ड) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर मग e-Urvarak नावाचा एक नवीन पेज आपल्या पुढ्यात या ठिकाणी उघडेल. मग या नवीन पेजवरील किसान कॉर्नर या पर्यायावर आपणास क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर मग Retailer opening stock as on today या पेजवर आपणास रिडायरेक्ट केले जाणार आहे. यानंतर मग आपलं राज्य, दुकानदाराचा आयडी, माहीती नसेल तर एजन्सीचं नाव. जर ते देखील माहिती नसेल तर All हा पर्याय तसाच राहू द्या. मग शो या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर मग तुम्हाला जिल्ह्यातील कोणत्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून कळणार आहे. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानाचा रिटेलर आयडी निवडला की त्या दुकानात किती खताचा साठा शिल्लक आहे ते समजतं.

यामध्ये संबंधित दुकानदाराकडे कोणत्या कंपनीचा किती साठा शिल्लक आहे याची सर्व माहिती असते शिवाय दर देखील दिलेले असतात. मात्र अनेकदा दर अपडेट केलेले नसतात त्यामुळे अपडेटेड दर व सर्वप्रथम जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक ठरणार आहे.

निश्चितच ही वेबसाईट भारत सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आली असल्याने ही वेबसाईट वापरण्यासाठी सुरक्षित असून या वेबसाईट मध्ये दिलेली माहिती ही योग्य असते. म्हणजेच या वेबसाईटमुळे शेतकरी बांधवांना आता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या जवळील खताच्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती मिळवता येणार आहे.

Online Satbara Utara :मोठी बातमी आता नाही मिळणार ऑनलाईन सातबारा

WhatsApp Image 2023 01 18 at 12.19.02 PM 1

ऑनलाईन सातबारा सेवा बंद ! शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या,

🗣️ ऑनलाईन सातबारा सेवा बंद!

▪️विविध शासकीय आणि इतर शेतीच्या विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ – अ उताराची गरज असते.

▪️शेतकऱ्यांचे काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती. पण ही सेवा सध्या बंद करण्यात आली आहे.

▪️ऑनलाईन उतारे बंद झालेच आहेत पण तलाठी कार्यालयेसुद्धा मागच्या काही दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी शेतकरी करू लागले आहेत.

Online Satbara Utara : देशातील कृषी क्षेत्रात गेल्या काही दशकात मोठा अमुलाग्र असा बदल झाला आहे. या स्मार्टफोनच्या युगात कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वावर वाढला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील कृषी क्षेत्र अधिकच गतिमान होण्यास मदत मिळाली आहे.
🐓 कोंबडी आधी की 🥚अंडं आधी❓
📢 http://davandi.in/2023/01/18/the-chicken-or-the-egg-first-did-you-find-it-scientists-found-the-answer-to-this-difficult-question/

Online Satbara Utara : कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असो किंवा इतर कोणतीही माहिती असो सर्व कामे आता ऑनलाइन केली जात आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन अर्जाला अधिक प्राधान्य दिले आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक सातबारा उतारा आणि आठ अ उतारा देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.

म्हणजेच शेतकरी बांधव आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर आपल्या शेता जमिनीचा सातबारा उतारा आणि आठ अ चा उतारा ऑनलाइन सहजरीत्या प्राप्त करत आहेत. मात्र आता ही सेवा बंद करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

Online Satbara Utara : गेल्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्याने सातबाराचे डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालयात उपलब्ध असल्याचे संकेतस्थळावर नमूद केले आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन सातबारा उतारा शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

खरं पाहता शेतकरी बांधवांसाठी शासन कायमच वेगवेगळ्या योजना आणत असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ अ चा उतारा आवश्यक असतो. या कागदपत्राविना शेतकऱ्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत तलाठी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने उतारा काढणे ही एक वेळ खाऊ प्रक्रिया आहे.

अनेकदा तलाठी कार्यालयात शेतकरी बांधव उतारा काढण्यासाठी जातात मात्र त्या ठिकाणी कार्यालयात बंद राहते यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस वाया जातो. शिवाय वेळेत सातबारा उतारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट वाढते. दरम्यान शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेऊन शासनाने ऑनलाइन पद्धतीने सातबारा आणि आठ चा उतारा उपलब्ध करून दिला आहे.

Online Satbara Utara : मात्र आता डिजिटल सातबाऱ्यांची ही सेवा बंद आहे. यामुळे शेतकरी बांधवांना उतारा काढण्यासाठी पूर्वीप्रमाणेच पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे आता शेतकरी बांधव संतप्त झाले असून लवकरात लवकर ही सेवा पुन्हा एकदा बहाल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

▪️दरम्यान, शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरीची सेवा कोणत्यातरी तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली असावी, यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ती पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

PM Kisan: पी एम किसान योजना, करोडो शेतकरी लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी

WhatsApp Image 2023 01 17 at 5.02.04 PM 1

सरकारने जारी केले नवे ४ नियम, पहा तुम्हाला मिळणार का १३ वा PM Kisan हप्ता, सन्मान निधी

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) च्या 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023:

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) च्या 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्हीही या सरकारी योजनेसाठी अर्ज केला असेल, तर या महिन्यातच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, पण त्याआधी कृषी मंत्रालयाने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, ज्यामुळे खात्यात पैसे येणार नाहीत.

सरकारने जारी केलेल्या सूचना
यूपी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसानच्या (PM Kisan) 13 व्या हप्त्यासाठी फक्त काही लाभार्थ्यांना पैसे मिळतील.

यूपी सरकारने म्हटले आहे की, जो कोणी शेतकरी या 4 पॅरामीटर्सची पूर्तता करेल, त्याच्या खात्यात पैसे येतील-

1 – शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये असे लिहिले पाहिजे की, शेतकरी त्या जमिनीचा वास्तविक मालक आहे.

2 – याशिवाय, पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्याने (Farmer) त्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.

3 – याशिवाय शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे.

4 – बँक खाते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी देखील जोडलेले असावे.

जर कोणत्याही शेतकऱ्याने या चार बाबींची पूर्तता केली तरच त्याला या सुविधेचा लाभ घेता येईल. याशिवाय, ज्या शेतकऱ्यांचे तपशील पूर्ण नाहीत त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.

12 हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांची कोट्यवधी कपात करण्यात आली
पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता म्हणून सरकारने सुमारे 22,552 कोटी रुपये जारी केले. त्याचवेळी, सरकारने 12वा हप्ता म्हणून 17,443 कोटी रुपये जारी केले होते. यामध्ये, लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. 30 जानेवारीपर्यंत, केंद्र आणि राज्य सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याचा लाभ मिळेल याची खात्री करत आहेत.

पीएम किसानशी संबंधित येथे तक्रार करा
तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, [email protected] या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे