एसटी बस चा मोफत प्रवास ‘ या ‘ नागरिकांना मिळणार

WhatsApp Image 2023 01 17 at 3.42.10 PM

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजना ही सुरू केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना राबवण्याकरिता यापूर्वीच घोषणा केलेली होती. यासंबंधी जीआर सुद्धा निघालेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या मोफत एसटी प्रवास योजने संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. MSRTC Free Travel Scheme Maharashtra. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये फ्री मध्ये प्रवास मिळणार आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये 50 टक्के सवलत तसेच नीम आराम बसेस मध्ये 50 टक्के सवलत आणि शिवशाही बसेस मध्ये 30 टक्के ते 45 टक्के सवलत लागू केलेली होती.free traveling scheme Maharashtra. या योजने संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेल्या आहे.

फ्री बस सेवा महाराष्ट्र (Free Bus Scheme Maharashtra):-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या Free Bus Scheme Maharashtra 2023 अंतर्गत आता 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे वय हे 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेस करिता उपलब्ध असणार आहे. free traveling scheme maharashtra. या योजनेमुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते आता मोफत प्रवास करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वागत करण्यात येत आहे.
Free Bus Scheme Maharashtra,free traveling scheme 2023,ST चा प्रवास मोफत

मोफत प्रवासाकरिता खालील कागदपत्रे सोबत पाहिजे:-
आजपासून मोफत बस प्रवास योजना अंतर्गत सुरू होत असलेल्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत तुम्हाला सवलत मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र तसेच एसटी बसचे स्मार्ट कार्ड किंवा डिजिटल पद्धतीमध्ये जर तुमच्याकडे एम आधार किंवा डीजे लॉकर यापैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास तुम्हाला सवलत मिळते.

मोफत एसटी (बस) प्रवास योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो? :-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत एसटी प्रवास योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे. ज्यांचे वय 75 वर्षांवरील आहे, अश्या नागरिकांसाठी या योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

50% सवलत कोणाला मिळणार?:-
ज्या जेष्ठ नागरिकांचे वय हे 65 ते 75 या दरम्यान आहे, अश्या नागरिकांना या योजने अंतर्गत 50% सवलत ही देण्यात मिळणार आहे.

ही योजना एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये सुरू असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.

मोफत प्रवास योजना अर्ज प्रक्रिया:
एसटी महमंडळाकडून(MSRTC Free Travel Scheme) राबविण्यात येणाऱ्या या योजने अंतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता नाही. वरील दर्शविलेली आवश्यक कागदपत्रे सोबत ठेऊन तुम्ही या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.

ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक घरा घरात पोहचली पाहिजे, त्या करिता या पोस्ट ला जास्तीत जास्त शेअर करा.

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडीं 16/1/23

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 नाना पटोलेंकडून नाशिकमधील उमेदवाराचं नाव जाहीर, म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”
नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली.

🔰 अपक्ष अर्ज दाखल केल्यानं कारवाईची टांगती तलवार; सत्यजीत तांबे म्हणाले, “१८ किंवा १९ तारखेला…”
सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे…

🔰 महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी; पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज
महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरुड परिसरात पार पडली. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले.

🔰 भाजपाचा नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा? गिरीश महाजनांच्या विधानामुळे संभ्रम वाढला; म्हणाले, “पाठिंबा देऊ तो…”
Nashik Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

🔰 “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकूण २०-२२ लोकांनी अर्ज केले, त्यातील…”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण २०-२२ उमेदवारांनी अर्ज केले होते, अशी माहिती दिली आहे.

🔰 “राधाकृष्ण विखे पाटील असतील भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा”, प्रकाश आबंडेकर यांचं मोठं विधान; म्हणाले, “फडणवीसांना कदाचित…”
औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली.

🔰 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश निवडीत केंद्र सरकारला हवा आहे हस्तक्षेप; किरण रिजिजू यांचे पत्र
केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजिजू हे सुरुवातीपासून कॉलेजियम पद्धतीला विरोध करत आले आहेत.

🔰 अमरावती पदवीधर मतदारसंघात जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान
या निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशा थेट लढतीचे चित्र असले, तरी अन्‍य उमेदवारांमध्‍ये होणाऱ्या मतविभागणीचा फायदा किंवा नुकसान कुणाला होऊ शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.

🔰 ठाणे : टोरंट पाॅवर वीज थकबाकीदारांची भामट्यांकडून आर्थिक फसवणुक
भामट्यांपासून सावध राहण्याचे टोरंट पाॅवर कंपनीचे आवाहन

🔰 डोंबिवलीत शुक्रवारपासून दहा दिवसांचा पुस्तक अदान प्रदान सोहळा
वाचकाने ५० रुपये किंमतीचे पुस्तक देण्यासाठी आणले असेल आणि त्याला कार्यक्रमस्थळी ५०० रुपये किंमतीचे पुस्तक आवडले तर ते पुस्तक वाचकाला स्वत: जवळील पुस्तक देऊन घेता येणार आहे.

🔰 नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा
महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

🔰 अफगाणिस्तानच्या कर्तृत्ववान महिला, माजी खासदार नबीजादा यांची गोळ्या झाडून हत्या; तालिबानसमोर झुकल्या नाहीत
नबीजादा या फक्त ३२ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्या काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

🔰 मालेगाव आणि रिसोड येथे कडकडीत बंद, शिरपूर जैन येथील घटनेचा निषेध
एका समाजातील युवकाने व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने शिरपूर येथे दोन गटात वाद उफाळून आला होता.

🔰 मुंबईतील ६ हजार कोटी रुपयांच्या रस्ते कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचं पुन्हा टीकास्र; शिंदे सरकारला विचारले १० प्रश्न
मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

🔰 २५ वर्षांच्या स्ट्रीट डॉग लव्हर तरूणीला चिरडत गेली थार, चंदीगढमधली धक्कादायक घटना
थार या कारने या तरूणीला उडवलं आहे, ही मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत

🔰 Government Jobs: कॉपी करणाऱ्या उमेदवारांना ‘या’ राज्यात १० वर्षांसाठी नोकरभरती बंद
सरकारी नोकरीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या उमेदवारांना १० वर्षांसाठी केले जाणार बॅन

🔰 Virat and Dhoni Daughters: धोनी, कोहलीच्या मुलींविरोधात आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
Virat and Dhoni Daughters: विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मुलींबाबत सोशल मीडियावर काही लोकांनी आक्षेपार्ह कॉमेंट केल्या होत्या. त्यावर आता दिल्ली महिला आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला.

सर्वसामान्यांना नवीन वर्षाचा मोठा झटका ! मोबाईल रिचार्जच्या किंमतीत होणार वाढ

WhatsApp Image 2023 01 09 at 11.22.10 AM

MOBILE RECHARGE : टेलिकाॅम कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्जचे दर वाढवणार आहेत – त्यामुळे फक्त कॉलिंगच नाही, तर आता इंटरनेट रिचार्जही महागण्याची शक्यता आहे.

🤷‍♀️ कशामुळे वाढणार बरं किंमती ?

💰 5G सेवा चालवण्यासाठी कंपन्यांना दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळेच टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार आहे.

🤔 किती रुपयांनी होणार वाढ बघा?

💵 फिच रेटिंग्ज व जेएम फायनान्स यांच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15 ते 20 टक्के वाढ करू शकतात.

☎️ ही वाढ केवळ प्रीपेड पुरतीच नसून, पोस्टपेड प्लॅनच्या किमतीही वाढू शकतात. पोस्टपेड प्लॅनमध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

🗣️ मात्र, ही दरवाढ एकाच वेळी न करता, 2 ते 3 हप्त्यांमध्ये केली जाणार असल्याचे जेएम फायनान्शिअलचे म्हणणे आहे.

📍 दरम्यान रिचार्जच्या नवीन किमतीविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू

🙏 मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ होणार – हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी

WhatsApp Image 2023 01 02 at 4.58.09 PM

📱 मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी ! – मुकेश अंबानी यांची जिओ 5G नेटवर्कबाबत मोठी घोषणा

🗣️ नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल युजर्ससाठी रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2023 मध्ये देशभरातील प्रत्येक शहरात, गावात जिओ 5G सुविधा उपलब्ध होईल अशी घोषणा केली आहे.

🤳🏻तसेच जिओ 5G नेटवर्कमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युनिक डिजिटल सोल्यूशन प्रदान करण्याची ही संधी मिळणार, जिओ 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करील.

🙏 मोबाईल युजर्ससाठी – ही बातमी खूप महत्वाची आहे, आपण ही माहिती इतरांना देखील शेअर करा.

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सायबर सुरक्षा

WhatsApp Image 2023 01 02 at 4.36.42 PM

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सायबर सुरक्षा 🛡️

🤔 महत्वाची जागतिक आकडेवारी आपणास माहित आहे का?


👹 जगभरात सरासरी ५० % लघु आणि मध्यम उद्योगांवर सायबर हल्ला होत आहे.
👹 ज्या लघु उद्योगांवर सायबर हल्ला होतो, त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लघु उद्योग सहा महिन्यांच्या आत अगदी बंद होतात.
👹 उपलब्ध जागतिक सायबर सुरक्षा मानक लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महागडे, जास्त संसाधन वापरणारे, आणि गुंतवणुकीवर कमी परतावा करणारे आहेत.

❓❓ यावर ऊपाय काय❓❓


✅ तब्बल १८ देशांतील लघु आणि मध्यम उद्योगांवर संशोधन करून, बी डी एस एल सी सी आय (Business Domain Specific Least Cybersecurity Controls Implementation) म्हणजेच व्यवसाय क्षेत्र विशिष्ट किमान सायबरसुरक्षा नियंत्रणे अंमलबजावणी हे नवीन मानक जन्माला आले.


✅ फक्त तुमच्या व्यवसाय क्षेत्रानुसार लागणारी सायबरसुरक्षा नियंत्रणांची अंमलबजावणी सोप्या पध्दतीने करा आणि तुमचा व्यवसाय सुरक्षित ठेवा.


✅ हे सगळं तुम्ही वापरु शकता
खास आम्ही बनविलेल्या वेबसाईटवर

🤠 आजच आपल्या लघु आणि मध्यम उद्योगाची नोंदणी करा 😊🙏🏻

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे